cold
sakal
पुणे - राज्यात थंडी कमी अधिक होत असली तरी गारठा कायम आहे. सकाळच्या वेळी थंडीमुळे हुडहुडी अनुभवायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी पारा सातत्याने १० अंशांच्या खाली आहे. उद्या (ता. २७) राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होत, थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.