सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राचा केंद्रातील दुवा हरपला - छगन भुजबळ

काँग्रेस (Congress)चे युवा नेते राज्यसभा सदस्य खासदार राजीव सातव (MP Rajiv Satav) यांचे दुःखद निधन झाले.
Rajiv Satav
Rajiv SatavGoogle
Updated on

नाशिक : काँग्रेस(Congress)चे युवा नेते राज्यसभा सदस्य खासदार राजीव सातव (MP Rajiv Satav) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा केंद्रातील एक दुवा हरपला असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan BHujbal) यांनी व्यक्त केल्या आहे. (With the demise of MP Rajiv Satav Maharashtra lost its link with the Center says Chhagan Bhujbal)

मंत्री छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. त्यांच्या संसदेतील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. काँग्रेस पक्षातील अतिशय निष्ठावान आणि राहुल गांधी यांचे अतिशय जवळचे सहकारी असलेले सातव यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं होतं. सातव हे काँग्रेस पक्षातील एक उमदं युवा नेतृत्व होतं. त्यांचे आणि आमचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. राज्यातील आणि देशातील तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या सातव यांच्या निधनामुळे देशाने एक युवा संसदरत्न व समाजभुषण व्यक्ती गमावला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Rajiv Satav
राजीव सातव, तू हे काय केलेस...; संजय राऊतांची भावनिक पोस्ट

तसेच खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राचा केंद्रातील दुवा हरपल्याची भावना भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. सातव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी व माझे कुटुंबीय सातव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती दवो हीच प्रार्थना करतो असे मंत्री छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.

Rajiv Satav
हिंगोली ते दिल्ली, जाणून घ्या राजीव सातव यांचा राजकीय प्रवास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

State Government Revamps Land Acquisition System; 103 Officer Posts Reorganized
Travel Alert: Pune–Mumbai Passengers Face Delays as 25 Trains Take Alternate Route
FDA and Rural Police Crack Down on Chemical Milk Production Unit in Phaltan
mantralay
Marathi News Esakal
www.esakal.com