Amruta Fadnavis: फेक अकाऊंटवरुन अमृता फडणवीसांना शिवीगाळ करणाऱ्या महिलेला अटक

ठाण्यातून या महिलेला अटक करण्यात आली असून तिचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
Amruta Fadnavis
Amruta FadnavisSakal
Updated on

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना सोशल मीडियावर शिवीगाळ केल्याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून ही महिला शिवीगाळ करत असल्याचं समोर आलं आहे. (Amruta Fadnavis)

Amruta Fadnavis
Nitish Rane: देवेंद्र फडणवीस 'हिंदुहृदयसम्राट' तर नितेश राणे 'चायना आयटम'; शिवसेनेचा हल्लाबोल

या प्रकरणात ठाणे जिल्ह्यातून या महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेचं नाव स्मृती पांचाळ असं आहे. पोलिसांनी या महिलेचा मोबाईल जप्त केला आहे. या महिलेने गणेश कपूर या बनावट नावाने अमृता फडणवीस यांना शिवीगाळ केली होती. ७ सप्टेंबर रोजी अमृता फडणवीस यांच्या फेसबुक पोस्टखाली या महिलेने अपमानास्पद पोस्ट टाकल्या होत्या.

Amruta Fadnavis
आमचे देवेंद्र फडणवीस हे हिंदूहृदयसम्राट ; आमदार नितेश राणेंकडून उल्लेख

या पोस्ट्स अत्यंत अर्वाच्य शब्दांत होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्याच वेळी एका अज्ञात फेसबुक युजरविरोधात गुन्हा दाखल केला होता. अटक केल्यानंतर ही महिला फेक अकाऊंट वापरून शिवीगाळ करत असल्याचं समोर आलं. तिने गणेश कपूर या नावाने फेक अकाऊंट तयार केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com