ओव्हरटेक केल्यानं महिलेला भर चौकात मारहाण! सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट सवाल : Supriya Sule | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video_Nagpur news

Supriya Sule: ओव्हरटेक केल्यानं महिलेला भर चौकात मारहाण! सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट सवाल

मुंबई : एका महिलेनं रस्त्यावर वाहन चालवताना ओव्हरटेक केल्यानं प्रचंड संतापलेल्या एका कार चालकानं महिलेला भर चौकात मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकारावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. (woman thrashed by man while overtaking his car Supriya Sule direct question to Fadnavis)

सुप्रिया सुळे यांनी महिलेला मारहाण झालेला व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात महिलेला भरचौकात मारहाण करण्यापर्यंत मजल जाते. कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? या राज्यात महिला सुरक्षित आहे का? असा सवाल करत या प्रकरणाचा कसून तपास होऊन या व्यक्तीला कठोर शासन झालेच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

काय घडलंय नक्की?

नागपूर शहरात एका कारला महिलेनं ओव्हरटेक केलं म्हणून तिला भर चौकात बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला होता. या मारहाणीचा व्हिडिओ रस्त्यातील एका व्यक्तीनं रेकॉर्ड केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला.