पुणे - ‘योग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, त्यांना सक्षम करणे आणि कामासाठी पोषक वातावरण तयार करणे हे मनुष्यबळ विकास विभागाचे काम आहे. कर्मचाऱ्यांवर सतत देखरेख ठेवणे आणि सतत सूचना देणे उपयुक्त ठरत नाही, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे अपेक्षित यश मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवणे आणि त्यांना कामाचे स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी शुक्रवारी केले.