esakal | राज्यातील शिक्षण विभागातील कामकाज खोळंबले
sakal

बोलून बातमी शोधा

Education

राज्यातील शिक्षण विभागातील कामकाज खोळंबले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यात (State) प्रत्येक जिल्ह्यात (District) कोरोना प्रादुभार्वामुळे शिक्षण विभागातील (Education Department) कर्मचाऱ्यांची (Employee) उपस्थिती १५ टक्के केली आहे. परंतु कार्यालयीन नियमित कामे (Work) थांबलेली नाही. मात्र, तरी देखील शाळेतील मुख्याध्यापक, लिपिक कर्मचारी मासिक पगार पत्रके, वैद्यकीय परिपूर्ती बिले अशा कामांसाठी शिक्षण विभागाच्या कार्यालयात जातो. त्यावेळी संबंधित कार्यासीन अधिकारी (Officer) आलेले नाहीत, अशी कारणे देऊन कामे रखडविली जात आहेत. शिक्षण मंत्री, शिक्षण आयुक्तांनी याकडे गांभीर्याने पहावे आणि नियमित कामांना गती मिळण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने निवेदनाद्वारे केली आहे. (Work of the education department was disrupted)

एखाद्या शाळेतील मुख्याध्यापक, लिपिक कर्मचारी शिक्षण विभागातील कार्यालयात जातात, त्यावेळी संबंधित कार्यासीन अधिकारी आलेले नाहीत, असे सांगण्यात येते. प्रत्येक कार्यालयामार्फत जॉबचार्ट जाहीर करावा, शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थितीबाबतचे वेळापत्रक प्रसिद्ध करावे, ऑनलाइनद्वारे कार्यालयीन कामकाज करावे, अशी मागणी परिषदेचे वेणूनाथ कडू, नरेंद्र वातकर आदींनी केली आहे.

मुख्याध्यापक, कर्मचारी त्रस्त

गेल्या वर्षभरापासून निवृत्ती वेतन, मुख्याध्यापक मान्यता, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव, वैद्यकीय परिपूर्ती बिले, सेवा खंड क्षमापन, विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रस्ताव, उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक मान्यता, हे प्रलंबित आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्था, मुख्याध्यापक आणि कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा