धडधाकट आहात? ‘हॅप्पी हायपॉक्सिया’ शोधा आता घरीच्या घरी

धडधाकट आहात? ‘हॅप्पी हायपॉक्सिया’ शोधा  आता घरीच्या घरी

कोल्हापूर: खोकला येत नाही, धाप लागत नाही, मला काहीच होत नाही. म्हणून मी आनंदी आहे; मात्र कोविडची (covid 19) लक्षणे दिसतात तेव्हा ऑक्सिजनची(Oxygen)पातळी खालावलेली असते. जेव्हा रुग्ण रुग्णालयात दाखल होतो, तेव्हा त्याला न्युमोनिया होतो आणि पुढे तो ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवर जातो. त्यामुळे धाप लागत नसली तरीही ‘हॅप्पी हायपॉक्सिया’मध्येच तुमचे निदान होते. तुम्ही धडधाकट, आनंदी असला तरीही तुमची प्रकृती कशी आहे, हे विनाखर्च घरी पाहू शकता.(world-doctors-day-special-happy-hypoxia-self-test-in-home-tips-marathi-news)

कोल्हापूर, सांगलीसह सात जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या कमी होत नाही आणि बरेच रुग्ण निदान लागताच अत्यवस्थ होतात, अशी परिस्थिती का आहे, याच्या मुळात जाण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ने केला आणि यातील तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधला. तेव्हा असे लक्षात आले, की ‘हॅप्पी हायपॉक्सिया’मुळे रुग्ण अधिक गंभीर होतात. काय आहे, ‘हॅप्पी हायपॉक्सिया’ आणि त्यामुळे काय होते, तो कसा शोधायचा याबाबत हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजय केणी यांच्याशी संवाद साधला. तेव्हा ‘हॅप्पी हायपॉक्सिया’ महत्त्वाचा मुद्दा पुढे आला.

काय असते वस्तूस्थिती

अस्थमा, सीओपेडी, हृदयविकार, यात जेव्हा धाप लागते, तेव्हाही ऑक्सिजनची लेव्हल कमी झालेली असते. ती ८८-८५ होते. अशावेळी या रुग्णांना धाप लागते, पण कोविडमध्ये अनेक रुग्णांत असे दिसून आले, की या रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल ७०-८० पर्यंत खालावली, तरीही त्यांना धाप लागत नाही आणि त्यानंतर रुग्ण अत्यवस्थ होतो, असे रुग्ण डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयात जात नाहीत. याला ‘हॅप्पी हायपॉक्सिया’ असे म्हटले जाते. ‘हायपॉक्सिया’ म्हणजे ऑक्सिजनचे रक्तातील प्रमाण कमी होणे आणि ‘हॅप्पी’ का तर रुग्णाला धाप लागत नाही, रुग्ण आनंदीच असतो. ऑक्सिजन लेव्हल ६०-७० टक्क्यांपर्यंत खालावली तरीही त्यांना धापेचे संकेत मिळत नाहीत.

म्हणून डॉक्टरांकडे जात नाहीत

जोपर्यंत धाप लागत नाही, खोकला लागत नाही, तोपर्यंत व्यक्ती डॉक्टरांकडे जात नाही. लोकांचे हे लॉजिक बरोबर असले तरीही कोविडमध्ये हेच चुकीचे आहे. यामुळेच रुग्ण वेळेवर डॉक्टरांकडे जात नाही. ज्यावेळी रुग्ण सिटीस्कॅन करून येतो, त्यावेळी त्यांचा ‘स्कोअर’ जास्त असतो. ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते आणि त्यानंतर महत्त्वाचा जो उपचाराचा वेळ म्हणजे ‘गोल्डन हावर’ असतो की ज्यात ॲन्टी व्हायरल ट्रीटमेंट देऊन रुग्णाला बरे करता येते. तो ‘गोल्डन हावर’ गेलेला असतो.

प्रकृती गंभीर होण्यापूर्वी

रुग्णालयात जेव्हा रुग्ण दाखल होतो. तेव्हा त्याचा न्युमोनिया वाढत जातो, व्हेंटिलेटर लावावा लागतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा ताप येतो, खोकला येतो, त्यावेळी डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घेणे, आरटीपीसीआरची गरज असल्यास ती चाचणी करणे, दररोज ऑक्सिजनचे लेव्हल पाहणे, तसेच सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजन लेव्हल कमी होते का, हे पाहणे आवश्‍यक आहे.

असा शोधा ‘हॅप्पी हायपॉक्सिया’

हॅप्पी हायपॉक्सिया शोधायचा असल्यास जेव्हा त्रास नसतो, तेव्हा घरी सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची लेव्हल ही चार ते पाच टक्क्यांनी कमी असते. म्हणजे चालण्यापूर्वी ऑक्सिजन लेव्हल ही ९८ असेल आणि चालल्यानंतर ती ९२ झाली, तर नक्कीच गडबड आहे. कारण चालल्यानंतरसुद्धा ऑक्सिजनची लेव्हल पूर्वी इतकीच म्हणजे ९८ पाहिजे, किंवा ते ९९ झाली पाहिजे. फुफ्फुसात अशी व्यवस्था आहे, की तुम्ही व्यायाम करताना ही जादा ऑक्सिजन झाला, तर शरीरात बंद असलेले युनिट उघडतात आणि ऑक्सिजन जादा पाहिजे तितका घेतात.

घरीच चाचणी घ्या

‘हॅप्पी हायपॉक्सिया’ शोधायला पाहिजे. तो शोधण्याचे काम स्वतः रुग्ण किंवा लोक करू शकतात. पल्स ऑक्सिमीटर उपलब्ध आहे. त्यावर स्वतःचे ऑक्सिजन लेव्हल पाहा, सहा मिनिटे चाला, सहा मिनिटांनी जर नॉर्मल असेल तर काहीच काळजी नाही, पण जर सहा मिनिटांनी ऑक्सिजन कमी दाखवत असेल, तर ताबडतोब डॉक्टरांकडे जावा. आरटीपीसीआर करा, एचआरसीटी करा, गरज पडल्यास रुग्णालयात दाखल व्हा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com