जगप्रसिद्ध व्हायोलिनवादक डी. के. दातार यांचे मुंबईत निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

जागतिक कीर्तीचे व्हायोलीनवादक पंडित दामोदर केशवराव अर्थात डी. के. दातार (वय 86) यांचे बुधवारी रात्री मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. ते गोरेगाव येथे वास्तव्यास होते.

पुणे- जागतिक कीर्तीचे व्हायोलीनवादक पंडित दामोदर केशवराव अर्थात डी. के. दातार (वय 86) यांचे बुधवारी रात्री मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. ते गोरेगाव येथे वास्तव्यास होते.

ग्वाल्हेर घराण्याचे संस्कार त्यांच्यावर होते. ख्याल, ठुमरी, भजन यासारख्या गायन प्रकारांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले. भारतातील अनेक दिग्गज कलाकारांबरोबर अभिजात संगीताच्या मफलीत साथसंगत त्यांनी केली होती.

पद्मश्री, संगीत नाटक अकादमीचा तसेच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही त्यांना मिळाले होते. गायकी अंगाने व्हायोलीन वादन हे त्यांच्या वादनकलेचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या मागे पत्नी आणि डॉ. निखिल व डॉ. शेखर ही मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: The world famous violinist D K Datar passed away in Mumbai