
पाली : पृथ्वीच्या ओझोन थराचे संरक्षण करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी १६ सप्टेंबर हा दिवस विश्व ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. ओझोन थर हा वातावरणातील अतिशय महत्त्वाचा सुरक्षा कवच आहे, जो सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अतिनील (UV) किरणांपासून सजीवांसह आपल्याला वाचवतो. परिणामी या ओझोनच्या थराला जपण्याची व वाचवण्याची सर्वांची जबाबदारी झाली आहे.