World Rainforest Day: दरवर्षी हजारो चौरस किलोमीटर पर्जन्यवने होतायत नष्ट; कारण काय? संरक्षणासाठी उपाययोजना आवश्यक
Environment: २२ जून रोजी जागतिक पर्जन्यवन दिन साजरा केला जातो. मात्र मानवी हस्तक्षेपामुळे दरवर्षी हजारो चौरस किलोमीटर पर्जन्यवने नष्ट होत आहेत. त्यामुळे त्यांचे संरक्षण व संवर्धन आवश्यक आहे.
पाली : दरवर्षी 22 जून हा दिवस जागतिक पर्जन्यवन (Rainforest) दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील पर्जन्यवनांच्या महत्त्वावर, त्यांच्या ऱ्हासामागील कारणांवर आणि त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर प्रकाश टाकतो.