
Women's Maharashtra Kesari : सांगलीत रंगणार 'महिला महाराष्ट्र केसरी'
मुंबई - देशभरात पुरुष कुस्तीपट्टूंच्या बरोबरीने महिला कुस्तीपट्टू स्पर्धा गाजवतान दिसत आहेत. शिवाय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने देशाला पदक मिळवून दिलं होतं. तेव्हापासून महिला कुस्तीपट्टूंना चांगले दिवस आले आहेत. त्यातच आता महाराष्ट्रात महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे.
सांगलीत महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीनंतर महिला कुस्तीसाठी पुण्यात मोठा निर्णय घेण्यात आला. 23 आणि 24 मार्च या कालावधीत सांगलीत ही कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे.
सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीने महिला केसरीच आयोजन करण्यात आलं आहे. महिला केसरी कुस्ती स्पर्धेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेव मोहिते यांनी ही माहिती दिली.