'पद्मगंधाचे' प्रकाशक अरुण जाखडे यांचे निधन

मराठी साहित्यामध्ये आगळ्या वेगळ्या साहित्यकृतीनं मराठी वाचकांच्या मनाचा वेध घेणारी प्रकाशन संस्था म्हणून पद्मगंधा या प्रकाशन संस्थेचे मोठे योगदान आहे.
Arun Jakhade
Arun Jakhade

Arun Jakhade passed away: मराठी साहित्यामध्ये आगळ्या वेगळ्या साहित्यकृतीनं मराठी वाचकांच्या मनाचा वेध घेणारी प्रकाशन संस्था म्हणून पद्मगंधा या प्रकाशन संस्थेचे मोठे योगदान आहे. त्या संस्थेचे प्रमुख आणि ज्येष्ठ साहित्यिक अरुण जाखडे (Arun Jakhade) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्यानं मराठी साहित्यविश्वाची मोठी हानी झाली आहे. जाखडे हे प्रकाशक आणि व्यासंगी लेखक म्हणून मराठी साहित्य विश्वाला परिचित होते. त्यांच्या अनेक पुस्तकांना वेगवेगळे पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.

Arun Jakhade
मेहता पब्लिशिंग हाऊसचे संचालक सुनील मेहता यांचं निधन

जाखडे यांचे पुण्यात (Pune) निधन झाले. जाखडे यांच्या जाण्यानं मराठी साहित्य सृष्टीतील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी मेहता प्रकाशनाचे सुनील मेहता यांचे निधन झाले होते. आता जाखडे यांच्या जाण्यानं मराठी साहित्यविश्वाला आणखी मोठा धक्का बसला आहे. जाखडे यांनी मराठी साहित्यात डॉ. रा. चिं. ढेरे, लावणी वाड्मय, श्री. व्यं. केतकर, र. धों. कर्वे, अगाथा ख्रिस्ती, भाषा प्रकल्प आणि नंतर अल्बेर कामूच्या साहित्यावर विशेष काम केले. जाखडे इर्जिक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, पाचरुट, पावसाचे विज्ञान, या पुस्तकांचे लेखन केले आहे.

मराठी भाषा, त्याचे संवर्धन यासाठी जाखडे यांनी खूप प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी आपल्या प्रकाशन संस्थेच्या वतीनं वेगवेगळे उपक्रमही राबवले होते. त्याला वाचकांकडून चांगला प्रतिसादही मिळाला होता. मराठी साहित्य संमेलनामध्ये देखील त्यांचा सहभाग वाखाणण्यासारखा होता. मराठी पुस्तकांना चांगला वाचक मिळावा, मराठी वाचक वाढावेत यासाठी देखील त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यांच्या पद्मगंधा आणि उत्तम अनुवाद या दिवाळी अंकाचं वाचकांनी स्वागत केलं होतं. त्याला प्रतिसादही मोठ्या प्रमाणावर मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com