
Marathi Sahitya Sammelan: ९८वं मराठी साहित्य संमेलन नुकतंच देशाची राजधानी दिल्ली इथं पार पडलं. तीन दिवस चाललेल्या या साहित्य संमेलनाची यंदा बरीच चर्चा झाली. या संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय नेत्यांविरोधात विधानं केली गेली. याची खूपच चर्चाही झाली, यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. साहित्य संमेलनात बोलताना प्रत्येकानं काही मर्यादा पाळल्या पाहिजेत, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांच्या विधानावर उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे.