esakal | आरोग्य विद्यापीठाची परीक्षा अर्ज प्रक्रिया सुरू 
sakal

बोलून बातमी शोधा

A written examination will be conducted for students studying in colleges across the state affiliated to Maharashtra Health Sciences University

 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न राज्यभरातील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची हिवाळी सत्र लेखी परीक्षा होणार आहे.

आरोग्य विद्यापीठाची परीक्षा अर्ज प्रक्रिया सुरू 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न राज्यभरातील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची हिवाळी सत्र लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी परीक्षा अर्ज करावा लागेल. विभागीय केंद्रनिहाय अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. 

पदवी, पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरावा लागणार आहे. तिसऱ्या फेरीतील ही प्रक्रिया आहे. कुठल्याही विलंब शुल्काशिवाय मुंबई, औरंगाबाद, नांदेड, नागपूर व अमरावती क्षेत्रातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात अर्ज भरण्याची मुदत 7 ऑक्‍टोबर असेल. विद्यापीठात अर्ज सादरीकरणाची अंतिम मुदत 10 ऑक्‍टोबर आहे. उत्तर महाराष्ट्र, पुणे, कोल्हापूर व सोलापूर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात 7 ऑक्‍टोबर, विद्यापीठात 9 ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज सादर करता येतील. विलंब शुल्कासह महाविद्यालयात अर्ज सादर करण्याची मुदत 15 ऑक्‍टोबर असेल, तर विद्यापीठात 17 ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज सादर करता येईल. अतिरिक्‍त विलंब शुल्कासह महाविद्यालयात परीक्षा अर्ज भरण्याची मुदत 21 ऑक्‍टोबर असेल. 

loading image
go to top