कंगना, सोमय्या, राणांनंतर आमदार गोपीचंद पडळकरांना केंद्राची X दर्जाची सुरक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gopichand Padalkar

भाजप आमदार पडळकरांना केंद्र सरकारची X दर्जाची सुरक्षा देण्यात आलीय.

कंगना, सोमय्या, राणांनंतर आमदार गोपीचंद पडळकरांना केंद्राची X दर्जाची सुरक्षा

भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकरांना (Gopichand Padalkar) केंद्र सरकारची X दर्जाची सुरक्षा देण्यात आलीय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांनी वारंवार टीका केली होती. तसेच यापूर्वी त्यांच्यावर हल्ले झाले आहेत. त्यामुळेच त्यांना ही सुरक्षा दिलीय.

गोपीचंद पडळकरांवर राष्ट्रवादीकडून हल्ले झाले आहेत, त्यामुळं त्यांना ही सुरक्षा देण्यात आलीय. किरीट सोमय्या यांनाही याच दर्जाची सुरक्षा देण्यात आलीय. यावर काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी टीका केली की, आधी हेच लोक राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवतात त्यानंतर त्यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवते.

हेही वाचा: 'बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय'

दरम्यान, अभिनेत्री कंगना राणावत, किरीट सोमय्या, आमदार नवनीत राणा आणि त्यानंतर आता गोपीचंद पडळकर यांनाही केंद्रातर्फे सुरक्षा पुरवण्यात आलीय.

Web Title: X Level Security Of The Center To Bjp Mla Gopichand Padalkar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpGopichand Padalkar
go to top