
यशोमती ठाकूर यांचे नरेंद्र मोदींना उत्तर; म्हणाल्या...
लोकसभेत देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विधानाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी काँग्रेसला घेरले. नेहरूजी (Jawaharlal Nehru) म्हणाले होते की, काहीवेळा कोरियातील लढाईचाही आपल्यावर परिणाम होतो. त्यामुळे वस्तूंच्या किमती वाढतात आणि ते आपल्या नियंत्रणाबाहेर जाते. अमेरिकेतही काही घडले तर त्याचा परिणाम वस्तूंच्या किमतीवरही होतो, असे मोदी म्हणाले. याला उत्तर देताना ‘नेहरू अमर आहेत. त्यांचे विचार शाश्वत आहेत. त्यांनी मांडलेली भारताची कल्पना हीच भारताची खरी संकल्पना आहे’ असे ट्विट यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केले.
काँग्रेसची धोरणे अशी होती की, सरकारच महागाई नियंत्रणाबाहेर आहे असे मानू लागले. सध्या कोरोना महामारी असूनही महागाई ५.२ टक्के आहे. त्यातही अन्नधान्य महागाई ती टक्क्यांपेक्षा कमी आहे. काँग्रेस सरकारच्या जवळपास संपूर्ण कार्यकाळात देशाला दुहेरी आकडी महागाईचा सामना करावा लागला. काँग्रेसवाले त्यांच्या काळात जागतिक परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी लोकसभेत केला.
मला तुम्हाला सांगायचे आहे की, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू महागाईवर काँग्रेसच्या राजवटीत लाल किल्ल्यावर काय म्हणाले होते. यादरम्यान काँग्रेसने गदारोळ केला. मी नेहरूजींवर बोलत नाही अशी तुमची तक्रार आहे. आज तुमच्या इच्छेनुसार मी नेहरूजींवरच बोलेन. आजचा आनंद घ्या. तुमचे नेते म्हणतील मजा आली, असेही नरेंद्र मोदी (Narendra modi) म्हणाले.
हेही वाचा: हिमस्खलन : कामेंग सेक्टरमध्ये लष्कराचे सात जवान अडकले
आज काँग्रेसची सत्ता असती तर कोरोनाच्या खात्यात महागाई जमा करून बाहेर पडली असती. म्हणजे महागाईसाठी कोरोनाला जबाबदार धरल असतं. मात्र, ही समस्या गंभीर मानून आमचे सरकार ती सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करीत आहे. अमेरिका आणि ओईसीडी देशांमध्ये महागाई ७ टक्क्यांपर्यंत आहे. आम्ही दोष देऊन पळून जाणाऱ्यांपैकी नाही. प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्यांपैकी आहोत, असेही पंतप्रधान (Narendra modi) म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपांना यशोमती ठाकूर यांनी आपल्या पद्धतीने उत्तर दिले. ‘नेहरू अमर आहेत. त्यांचे विचार शाश्वत आहेत. त्यांनी मांडलेली भारताची कल्पना हीच भारताची खरी संकल्पना आहे’ असे ट्विट यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केले.
Web Title: Yashomati Thakur Jawaharlal Nehru Narendra Modi Congress Loksabha
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..