"शरद पवार आहेत म्हणून महाविकास आघाडीचं सरकार जोरात"

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी हे मत मांडलं आहे.
Yashomati Thakur
Yashomati Thakur Team eSakal

शरद पवार (Sharad Pawar) आहेत म्हणुन महाविकास आघाडीचे (MVA) सरकार जोरात सुरू आहे असं मत आज काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी व्यक्त केलं. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Commission for Woman) 29 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी यशोमती ठाकूर यांनी राज्यातील महिला धोरण आणि महिला सुरक्षितता अशा विषयांवर उपस्थितांशी संवाद साधला.

Yashomati Thakur
पातळी सोडून पंतप्रधानवर टीका नको, पंकजा मुंडेंचा सल्ला कोणाला?

महाविकास आघाडी काळात अजून महिला धोरणं आणखी प्रो ॲक्टीव करू शकतो. महीला धोरणांची अंमलबजावणी झाली पाहीजे. रस्त्यावर प्रत्येक २५ किमी वर टॉयलेट हवेत, हे कर्नाटक मध्ये आहे तर आपल्या इथे का नाही असंही त्या म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या की, महीला धोरणांना आपण महत्व देत नाहीत, त्यांना महत्व दिलं पाहीजे. कोस्टल रोड झाली नाही तरी चालेल पण मुलांसाठी, महीलांसाठी पैसे दिले पाहीजे यासाठी मी भांडते असं त्यांनी सांगितलं.

Yashomati Thakur
काँग्रेसला न्याय मिळत नाही, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखांची खंत

दरम्यान, या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे, नीलम गोऱ्हे, यशोमती ठाकूर, संजय पांडे, ज्योती ठाकरे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com