

Yogesh Kadam
esakal
Minister of State Yogesh Kadam alleges Manoj Jarange Patil
मराठा आरक्षण चळवळीचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी २२ ऑक्टोबर रोजी एक ऑडिओ क्लिपचा बॉम्ब टाकला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. मनोज जरांगे पाटलांना बदनाम कसं करायचं, त्यांच्याविरोधातल्या लोकांना कशा पद्धतीने विकत घ्यायचं; असा संवाद त्या क्लिपमध्ये होता. ती बैठक भाजपची असल्याचा दावा केला जातोय. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक स्थापन केलं आहे.