तुम्ही जिम सुरू करा, बघू काय होते ते - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू असून, सरकारकडे जिम पुन्हा सुरू करण्याचा मुद्दा उचलून धरावा, यासाठी जिम व्यावसायिक आणि शरीरसौष्ठवपटूंनी राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी ठाकरे यांनी ‘तुम्ही जिम ओपन करा, बघू काय होते ते,’ असा सल्ला त्यांना दिला.

मुंबई - ‘मी सांगतो, तुम्ही जिम सुरू करा. बघू काय होते ते!'' असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यायामशाळाचालकांना दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू असून, सरकारकडे जिम पुन्हा सुरू करण्याचा मुद्दा उचलून धरावा, यासाठी जिम व्यावसायिक आणि शरीरसौष्ठवपटूंनी राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी ठाकरे यांनी ‘तुम्ही जिम ओपन करा, बघू काय होते ते,’ असा सल्ला त्यांना दिला.

शारीरिक अंतराबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, गोल्फ आणि टेनिस यापेक्षा जास्त शारीरिक अंतर काय असू शकतो? मधु येथे आणि चंद्र तिथे. मी खेळायला सुरुवात केली, काय होते ते बघूया. 

Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: You start the gym and see what happens Raj Thackeray