'आदित्य साहेब तुम आगे बढो!', चिमुरड्याची घोषणाबाजी; पाहा Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

young boy slogan in support of shivsena leader Aditya Thackeray video goes viral maharashtra news

'आदित्य साहेब तुम आगे बढो!', चिमुरड्याची घोषणाबाजी; पाहा Viral Video

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला धक्का देत बंड केलं आणि राज्यातील महाआघाडी सरकार कोसळलं, एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांनी वेगळा गट स्थापन केला. यासोबतच भाजप सोबत युती केली आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या पडझडीनंतर आदित्य ठाकरेंनी राज्यभर दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. दरम्यान गणपती दर्शनाला गेलेल्या आदित्य ठाकरेंसमोर एका चिमुरड्या मुलाने "आदित्य साहेब तुम आगे बढो!" अशी घोषणा दिल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आदित्य ठाकरेंचा हा चिमुरड्या सोबतचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गणपती दर्शन करून येत असताना एका लहान मुलाने समोर येत आदित्य ठाकरे यांना नमस्कार केला त्यांच्या समोरच 'आदित्य साहेब, तुम आगे बढो' ची घोषणी दिली, यानंतर ठाकरे यांनी त्या छोट्या मुलाला सोबत घेत त्याच्यासोबत फोटो काढला. कुठल्या वर्गात शिकतोस असा प्रश्न देखील विचारल्याचे दिसत व्हिडीओत दिसत आहे. तसेच थांब तुझ्या उंचीला येतो म्हणात खाली बसत ठाकरे यांनी चिमुरड्यासोबत फोटो देखील घेतला. दरम्यान "हे प्रेम गद्दारांना मिळणार नाही.. कारण प्रेम हे खोके देऊन मिळत नसते..." असे कॅप्शन देत एका ट्विटर वापरकर्त्यांने तीस सेकंदांचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हेही वाचा: 'हा खोडसाळपणा फारच हास्यास्पद'; अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याबाबत शेलारांचे ट्विट

दरम्यान मविआने राज्यातील सत्ता गमावल्यानंतर शिवसेनेचे नते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरे करणे सुरू केले. शिव संवाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरेंनी बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तसेच शिवसेनेच्या पुर्नबांधणीसाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत, त्यांच्या दौऱ्यांना सामान्य जनतेतून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

हेही वाचा: पुण्याचे पालकमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Web Title: Young Boy Slogan In Support Of Shivsena Leader Aditya Thackeray Video Goes Viral Maharashtra News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..