Audio Clip Viral : गावातली लाईट गेली अन् तरूणाने थेट केला मुख्यमंत्र्यांना फोन

Audio Clip Viral
Audio Clip ViralSakal

वर्धा जिल्ह्यातील एका तरूणाने आपल्या गावातील लाईट गेल्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावला आहे. दोन तासापूर्वी लाईट गेल्यामुळे या तरूणाने फोन लावला आणि तो फोन मुख्यमंत्र्यांच्या विशेष अधिकाऱ्याने उचलला. त्यांच्यातील ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

अधिक माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील हर्षल नानावरे असं फोन करणाऱ्या तरूणाचं नाव आहे. फोन केल्यानंतर त्याने मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीला आपली समस्या सांगितली. आमच्या गावातील लाईट जवळपास दोन तासापासून गेली आहे, अजून आली नाही असं त्याने सांगितलं. त्यानंतर ओएसडीने त्याला चांगलेच धारेवर धरले.

"दोन तास लाईट गेली म्हणून तुम्ही काय थेट मुख्यमंत्र्यांना फोन करणार का? मुख्यमंत्र्यांच्या लायकीचं काम सांगायला पाहिजे ना तुम्ही. मुख्यमंत्री प्रत्येकाचं काम ऐकतात म्हणून तुम्ही काहीही कामासाठी फोन करणार का?" अशा शब्दांत सदर तरूणाला सुनावले आहे.

Audio Clip Viral
एसटीचं आगळवेगळं रूपडं जगाला दाखवणारा अन् सफर घडविणारा "अवलिया प्रवासी"

आमचा क्लास होता म्हणून आम्ही फोन केला असं तरूणाने सांगितल्यावर विशेषाधिकाऱ्यांनी सांगितलं की, "मी रॉकेलच्या बत्तीखाली अभ्यास करून अधिकारी झालोय आणि तुम्ही दोन तास लाईट गेली म्हणून थेट मुख्यमंत्र्यांना फोन करताय? तुझ्या भावना मला कळाल्या पण पर्यायी व्यवस्था असतात. त्यांचा वापर करा, आत्ता तुम्ही महावितरण विभागाला फोन करून ही समस्या सोडवा." असं विशेषाधिकारी म्हणाले. दरम्यान ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com