

solapur suside
sakal
सोलापूर : ‘आई-बाबांकडे लक्ष द्या’ असे भावजीला सांगून गेलेल्या व्यंकटेश पांडुरंग बलमेरी (वय २६) या तरुणाचा मृतदेह विजयपूर रोडवरील कंबर तलावात आढळला. त्याने आत्महत्या का केली, याचा शोध सदर बझार पोलिस घेत आहेत.
बुधवारी (ता. ५) रात्री आठच्या सुमारास व्यंकटेश घरातून बाहेर पडला होता. जाताना त्याने जेवण केले नव्हते. तो अक्कलकोट रोडवरील एका टॉवेल कारखान्यात जॉबर म्हणून काम करत होता. बुधवारी रात्री तो कारखान्यात जातो म्हणून घराबाहेर गेला होता. काहीवेळाने त्याला कुटुंबीयांनी कॉल केला, पण तो फोन उचलत नव्हता. त्याच्या कुटुंबीयांनी रेल्वे स्टेशन, एसटी स्टॅंड, सिद्धेश्वर तलाव, कंबर तलाव अशा ठिकाणी शोध घेतला. त्यावेळी त्याची दुचाकी कंबर तलावाबाहेर आढळली. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास व्यंकटेशच्या नातेवाइकांनी पोलिसांना खबर केली.
सदर बझार पोलिसांनी व्यंकटेशला कॉल केला, पण तो फोन उचलत नव्हता. त्यावेळी पोलिसांनी त्याचे मोबाईल लोकेशन शोधले. व्यंकटेशच्या मोबाईलचे लोकेशन तलावाजवळच येत होते. पोलिसांनी तलावात शोधाशोध केली, त्यावेळी व्यंकटेशचा मृतदेह तलावातील पाण्यावर तरंगताना दिसला. पोलिसांच्या मदतीने व्यंकटेशचा मृतदेह रात्री साडेदहाच्या सुमारास पाण्याबाहेर काढण्यात आला. त्याचा मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. गुरुवारी उत्तरीय चाचणीनंतर व्यंकटेशचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
एकुलता एक मुलगा गेला, आई-वडिलांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा
पांडुरंग बलमेरी यांना एक मुलगी, एक मुलगा होता. मोठ्या मुलीचा सोलापुरातच विवाह झाला होता. २६ वर्षीय व्यंकटेशच्या विवाहाची बोलणी सुरू होती, पण कोणाच्यातरी पैशावरून तो चिंतेत होता. बुधवारी सकाळी तो नाश्ता करताच घराबाहेर पडला. रात्री आठच्या सुमारास देखील तो जेवण न करताच घरातून बाहेर गेला. त्याने आत्महत्या केल्याचे समजताच आई-वडिलांच्या डोळ्यांतील अश्रूंच्या धारा थांबत नव्हत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.