SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त जागा राखीव ठेवाव्यात; युवक काँग्रेसची मागणी

अशोक गव्हाणे
Thursday, 16 July 2020

SSCच्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत जास्तीत जास्त जागा राखीव मिळाव्यात अशी मागणी आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

मुंबई : SSCच्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत जास्तीत जास्त जागा राखीव मिळाव्यात अशी मागणी आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. त्यांनी तसे पत्र वर्षा गायकवाड यांना दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अतिरिक्त अंतर्गत गुणांकन पध्दतीमुळे दिल्ली ICSE व CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांना निकालामध्ये भरमसाठ गुण मिळत असल्यामुळे गुणपत्रिकेच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. याउलट एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुणांकन फक्त 20% असल्याने त्यांचे गुणपत्रिकेत गुण कमी भरतात.परिणामी एसएससीच्या विद्यार्थ्यांवर बोर्डाच्या परिक्षेस सामोरे जाऊनही अकरावीच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत सरळसरळ अन्याय होणार असल्याची भूमिका सत्यजित तांबे यांनी घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर SSCच्या विद्यार्थ्यांवर अकरावीच्या महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रियेत अन्याय होऊ नये यासाठी SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत जास्तीत जास्त जागा राखीव ठेवण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस करत असल्याचे सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Congress Demand Maximum reservation should be made for SSC board students