Youth Congress initiative, announced Dr. Srikant Jichkar Leaders Fellowship
Youth Congress initiative, announced Dr. Srikant Jichkar Leaders Fellowship

युवक काँग्रेसचा उपक्रम; 'डॉ. श्रीकांत जिचकर लिडर्स फेलोशीप'ची घोषणा

Published on

पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीकांत जिचकार यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश युवक काँगेसतर्फे 'श्रीकांत जिचकर लिडर्स फेलोशिप' या योजनेची सुरवात होत असल्याची माहिती काल (ता. ०२) युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

'डॉ. श्रीकांत जिचकर लिडर्स फेलोशीप' म्हणजे नेमकं काय?
या फेलोशिप अंतर्गत काँग्रेसच्या मंत्र्यासोबत युवकांना सहा महिने काम करण्याची संधी मिळेल. पुढील ४ वर्षात एकूण २८८ तरुण/तरुणींना फेलोशिप देण्याची योजना आहे. याची नोंदणी आज (ता. ०२) पासून सुरू होत असून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडल्सवर ऑनलाईन नोंदणीप्रक्रियेसाठी लिंक उपलब्ध आहे. नोंदणीप्रक्रियेची शेवटची तारीख १५ जुलै आहे. निवड झालेल्या उमेदवारांना १ डिसेंबर पासून काम करण्याची संधी मिळेल. महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सरचिटणीस व प्रवक्त्या रिशिका राका व सोशल मीडिया राज्य समन्वयक प्रविणकुमार बिरादार या कार्यक्रमाचे समन्वयाचे काम पाहणार आहेत.
---------
भारत-बांगलादेश सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के
---------
तिबेटमध्ये चीनचा युद्धसराव; पडद्यामागे चीन चाललंय काय?
---------
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सातत्याने नवनवीन तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्यातील नेतृत्वगुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला आहे. मागील दीड वर्षांत वेक-अप महाराष्ट्र, सुपर 60, युवा जोडो अभियान अशा विविध कार्यक्रमातुन सामान्य कुटुंबातील युवकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी युवक काँग्रेसने सातत्याने प्रयत्न केले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून डॉ. श्रीकांत जिचकर लीडर्स फेलोशिप कार्यक्रम जाहीर करत आहोत, असेही सत्यजीत तांबे यांनी सांगितले आहे.

कोण होते डॉ. श्रीकांत जिचकर?
डॉ. श्रीकांत जिचकर हे अष्टपैलू आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे व्यक्तिमत्त्व होते. विविध क्षेत्रांत त्यांनी लोकोपयोगी कामे केली असल्याने युवकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांचे नाव या उपक्रमास दिले आहे.

युवकांना प्रशासकीय, शासकीय व राजकीय कामांचा अनुभव यावा, त्यातून नवनवीन तरुण राजकारणात व प्रशासकीय कामात पुढे यावेत या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून वय वर्षे २१ ते ३० या वयोगटातील युवक नोंदणी करू शकतात, अशी माहिती यावेळी तांबे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com