Corona: दोन वर्षानंतर राज्यात पहिल्यांदाच शून्य कोरोना मृत्यू

1 एप्रिल २०२० नंतर राज्यात पहिल्यांदाच आज शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे.
corona update
corona updatesakal Media

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ओसरत असताना आज राज्यासाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. सलग दोन वर्षाच्या जीवीतहानीनंतर आज एकही कोरोना मृत्यूची नोंद झालेली नाही. ही बाब राज्यासाठी दिलासादायक आहे.

1 एप्रिल २०२० नंतर राज्यात पहिल्यांदाच आज शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. त्याचबरोबर राज्याचा मृत्यूदर हा १.८२ टक्के इतका झाला आहे. ही राज्यातील जनतेला दिलासा देणारी बाब म्हणता येईल.

corona update
"जरा तरी लाजा बाळगा"; संबित पात्राच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

आज राज्यात एकूण ५४४ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून १००७ रुग्ण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच राज्यात 38 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 4771 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 4629 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 102 ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत.

मागच्या दोन लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेचा जास्त परिणाम झाला नाही. तसेच ही लाट लवकर ओसरत असून कोरोनाचे नियमही शिथिल होण्याची शक्यता आहे.

आज राज्यात शून्य कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यासोबतच राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 13 हजार 575 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.05 टक्के झालं आहे.

मागील दोन वर्षापासून देशातील जनतेला कोरोनाने हैराण करुन सोडलं आहे. त्यामध्ये कित्येक लोकांचे जीव गेले असून जवळपास राज्यात आतापर्यंत 77 लाख 13 हजार 575 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.05 टक्के आहे. असाच साकारात्मक परिणाम दिसला तर कोरोनाचे नियमही लवकर शिथिल होऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com