झेडपीचा नववर्षासाठी मोठा निर्णय! ग्रामसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांची हजेरी आता मोबाईल ॲपवर; वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसणार कर्मचाऱ्यांची मुख्यालयातील हजेरी

गावागावातील लोकांना ग्रामपंचायतींकडील कामे वेळेत करता यावीत, प्राथमिक आरोग्य सुविधा देखील वेळेत मिळावी या उद्देशाने आता जिल्हा परिषदेने दोन्ही विभागांकडील कर्मचाऱ्यांची हजेरी ऑनलाइन नोंदविण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले आहे.
solapur zp
solapur zpsakal media
Updated on

सोलापूर : गावागावातील लोकांना ग्रामपंचायतींकडील कामे वेळेत करता यावीत, प्राथमिक आरोग्य सुविधा देखील वेळेत मिळावी या उद्देशाने आता जिल्हा परिषदेने दोन्ही विभागांकडील कर्मचाऱ्यांची हजेरी ऑनलाइन नोंदविण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले आहे. त्यानुसार त्या त्या कर्मचाऱ्यांनी ते ॲप्लिकेशन डाऊनलोड करून मोबाईलवर दररोजची उपस्थिती तथा हजेरी भरायची आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे सद्यःस्थितीत जवळपास ८५० ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत. त्यांनी महिन्यातील किमान १८ ते २० दिवस (बैठका, दौरे, सुट्या वगळून) तरी मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणजेच काम करतात त्या गावात हजर राहणे आवश्यक आहे. जेणेकरून गावातील लोकांचे प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत हा त्यामागील हेतू आहे. त्यांची ऑनलाइन हजेरी तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना (बिडीओ) दिसणार असून त्यानुसार ते संबंधित ग्रामसेवकांचे पगार बिल तयार करतील.

दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडील जवळपास ५०० कर्मचाऱ्यांनाही अशाच पद्धतीने दैनंदिन हजेरी नोंदवावी लागणार आहे. विशेष बाब म्हणजे संबंधित कर्मचारी त्या मुख्यालयाच्या ५० ते १०० मीटर परिसरात असेल तरच त्या मोबाईल ॲप्लिकेशनवर हजेरी नोंदली जाणार आहे. या नवीन प्रणालीची अंमलबजावणी नवीन वर्षापासून करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक ग्रामसेवकास दररोजची उपस्थिती नोंदवावी लागणार

जिल्हा परिषदेने एक स्वतंत्र ॲप्लिकेशन तयार केले असून त्याद्वारे आता ग्रामसेवकांची हजेरी त्यावर नोंदविली जाणार आहे. ग्रामस्थांच्या सेवेसाठी ग्रामसेवक नियमित मुख्यालयाच्या ठिकाणी हजर राहणे अपेक्षित आहे. मोबाईल ॲप डाऊनलोड करून त्यावर प्रत्येक ग्रामसेवकास दररोजची उपस्थिती नोंदवावी लागणार आहे.

- इशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद सोलापूर

‘आरोग्य’च्या ५०० कर्मचाऱ्यांनाही ऑनलाइन हजेरी बंधनकारक

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडील आशासेविका, आरोग्य सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमधील डॉक्टर्स, अशा जवळपास ५०० कर्मचाऱ्यांना देखील त्यांची दररोजची हजेरी तथा त्यांच्या मुख्यालयातील उपस्थिती मोबाइलवरील ॲप्लिकेशनवर भरावी लागणार आहे. त्यातून कोणता अधिकारी, कर्मचारी त्यांच्या कामाच्या ठिकाणी उपस्थित असतो, हे समजणार आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडील सर्व कर्मचाऱ्यांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com