बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या

प्रकाश बनकर
शुक्रवार, 10 जुलै 2020

राज्य शासनाने संचालक मंडळाची मुदत संपत असलेल्या राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद : कोरोनामुळे उद्भवलेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने संचालक मंडळाची मुदत संपत असलेल्या राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निणयाचा ऑगस्ट २०२० मध्ये मुदत संपत असलेल्या औरंगाबाद बाजार समितीच्या विद्यामान संचालक मंडळाला फायदा होणार आहे. 

अद्यापही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही, त्यामुळे लॉकडाऊन मुदत शासनाने पुन्हा ३१ जुलैपर्यंत वाढविली आहे. अशा परिस्थितीत बाजार समित्यांच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याने मुदत संपत असलेल्या सर्व बाजार समित्यांच्या निवडणुका आणखी सहा महिने पुढे ढकल्या आहेत. त्यासंबधीचा आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव का. गो. वळवी यांनी काढला आहे. 

महत्त्वाची बातमीः आता कोरोना रुग्णांवर घरीच होणार उपचार

सहा महिने मुदतवाढीचा फायदा-पठाडे 
कोरोनाच्या गंभीर परस्थितीमुळे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला मुदतवाढ मिळावी अशी याचिका आपण कोर्टात दाखल केली होती, या दरम्यानच राज्य शासनाने बाजार समित्यांच्या निवडणुकांना २४ जुलैपासुन पुढे सहा महिने मुदतवाढ दिली आहे.

या निर्णयामुळे आमच्या संचालक मंडळाला सहा महिने काम करण्याची संधी मिळाली आहे, याचा फायदा राज्यातील सर्व बाजार समित्यांना होणार आहे, अशी माहीती बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिली. 

हेही वाचा- माझं लेकरु तहसीलदार झालं, हे कळलं तेव्हा मी रानात होते, मग काय इतका आनंद झाला म्हणून सांगू....


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election of market committees Postponed six months Aurangabad News