esakal | मध्य प्रदेशच्या भाचीला ६ वर्षांनी सापडली महाराष्ट्रात मामी, एका फोनवर पोलिसांनी घेतला शोध
sakal

बोलून बातमी शोधा

Relationship

आमचा आजपावेतो संपर्क झालेला नाही. मामीचे नाव केवळ नजमा असुन संभाषण घडवून देण्याची विनंती करते अन् वीस हजार लोकसंख्या असलेल्या गावातून केवळ 'नजमा'वरून तिला शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहते. मात्र पोलिसांच्या प्रयत्नातून अखेर त्यांच्यात संवाद घडवला जातो.

मध्य प्रदेशच्या भाचीला ६ वर्षांनी सापडली महाराष्ट्रात मामी, एका फोनवर पोलिसांनी घेतला शोध

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : मध्य प्रदेश राज्यातील देवास येथून अचानक अमरीन शेख नावाच्या युवतीचा पाचोड (ता.पैठण) पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांना मोबाईल येतो. अनोळखी अन् ते पण महिलेचा फोन आल्याने काही फसवेगिरी तर नसावी..? असा संशय येतो. संशय घेण्याअगोदर संबंधीत युवती आपली मामी गत सहा-सात वर्षांपासून पाचोडला आल्या. आमचा आजपावेतो संपर्क झालेला नाही. मामीचे नाव केवळ नजमा असुन संभाषण घडवून देण्याची विनंती करते अन् वीस हजार लोकसंख्या असलेल्या गावातून केवळ 'नजमा'वरून तिला शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहते. मात्र पोलिसांच्या प्रयत्नातून अखेर त्यांच्यात संवाद घडवला जातो.

वाचा : कोरोनाच्या काळात सुपारी अन् तंबाखूचा दुहेरी फटका, कोण म्हणाले ते वाचा


काही वर्षांपूर्वी मध्य प्रदेश येथून एक कुटुंब उदरनिर्वाहासाठी पाचोड येथे आल्याने कुटुंबातील उर्वरित सदस्यांची ताटातुट झाली होती. हलाखीच्या स्थितीने त्यांच्याकडे मोबाईल नव्हते. परंतु हळुहळु त्या कुटुंबातील अमरिन शेख ही मुलगी शिकली. तिने इंटरनेटवर पाचोड पोलिसांचे संपर्क क्रमांक शोधला अन् तिने सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांना कॉल केला. त्यांच्या मामी नजमा या पाचोड येथे राहण्यास असून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्यांचा एकमेकांशी संपर्क झालेला नाही. त्यांच्याशी आपली बोलण्याची इच्छा असुन संवाद घडवून देण्याची विनंती केली. तेव्हा पाचोड सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावामध्ये केवळ एकेरी नावावरून एका महिलेचा शोध घेण्याचे काम कठीण होते. मात्र, सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे, जमादार सुधीर ओव्हाळ, नरेंद्र अंधारे यांनी पाचोड गावामध्ये नजमा नावाच्या सर्व महिलांना जमा केल्या.

हेही वाचा : तुळजापूरला जाणाऱ्या रस्त्याचा काही भाग लागला कोसळू, वाहतूक झाली बंद

त्यांना मध्य प्रदेशमधील अमरिनचा संदर्भ देऊन ओळख पटविण्याचे काम सुरू झाले. तब्बल दीड तासानंतर नजमा नावाच्या महिलेचा शोध घेऊन त्यांचे भाऊ नबी पठाण यांच्याशी संपर्क साधून त्यांना विचारपूस केली. तेव्हा अमरिनला हवी असलेली तिची मामी नजमा सध्या औरंगाबाद येथे राहत असल्याचे समजले. त्यावरून त्यास मध्य प्रदेशातील 'त्या ' तरुणीचे छायाचित्र व्हॉट्सॲपच्या साहाय्याने बहिणीस पाठवण्यास सांगितला. त्यावर श्रीमती नजमा हिने अमरिन शेखचे छायाचित्र पाहून सदर युवती ही त्याच्या नेणे नंणदेची मुलगी असल्याची तिने ओळखले. त्यावरून नबी पठाण यांच्या मोबाईलवरून दोघींचे संभाषण करून दिले.

हेही वाचा : चाकूर पंचायत समितीत ७२ पैकी केवळ पाच कर्मचारी हजर, मनसेने केले आंदोलन

गेल्या कित्येक वर्षांपासून मामाचे निधन झाल्यामुळे मामी देवास (मध्य प्रदेश) येथून पाचोड येथे आल्यामुळे एकमेकींना न बोललेल्या मामीशी सदर युवतीने संपर्क झाल्यानंतर गहिवरून गेल्या. आपण संवाद साधल्याने आपणास आनंद झाला असून आता एकमेकांचे संपर्क क्रमांक उपलब्ध झाले. यानंतर आमचे नेहमी संवाद होईल असे सांगून त्यांनी पाचोड पोलिसांचे आभार मानले. पोलिसांनी अनेक महत्त्वाची कामे बाजूला सारून दाखविलेली कर्तबगारी व माणुसकीमुळे "खाकी"लाही पाझर फुटतो. याचे जिवंत उदाहरण पाहावयास मिळाले आहे. परिसरात याच कामगिरीची चर्चा होताना दिसत आहे.

(संपादन - गणेश पिटेकर)

loading image