मराठा आरक्षणासाठी मन्याड धरणात आणखी चार तरुणांच्या उड्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

लोणी खुर्द (औरंगाबाद) : पाराळा (ता.वैजापूर) येथील मन्याड धरणात मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेण्यासाठी आलेल्या आणखी चार तरुणांनी आज (ता. 31) मन्याड धरणात उड्या मारल्या. पोलिस व राष्ट्रीय आपत्ती निवारण टीमने त्यांना बाहेर काढले असून धरणावर तणावाची परिस्थिती आहे. 

मराठा समाजाच्या युवकांनी सोमवारी (ता. 30) तहसील कार्यालय जलसमाधी घेणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे  दिला होता. आज (ता. 31) मन्याड धरणावर पहाटेपासूनच परिसरातील लोक जमा झाले. सकाळी एका तरुणाने उडी घेतली, त्याला लागलीच बाहेर काढले. पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात आहे. 

तहसीलदार सुमन मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार हे आंदोलकांनची समजूत काढण्याचे प्रयत्न करत आहेत परंतु आंदोलक जिल्हाधिकाऱ्याना मन्याड धरण येथे बोलावण्यावर ठाम असून  जो पर्यंत ते येत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्यावर ठाम आहेत.

आंदोलकांचा दोन तासांचा अल्टीमेटम..
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः येऊन लेखी अश्वासन दिले नाही तर सुमारे 400 आंदोलक उड्या मारण्याच्या तयारीत आहेत. 
 
Web Title: maratha kranti morcha 4 jumped in manyad dam