औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या बांधवांसह कोपर्डीतील पीडित भगिनीला सोमवारी (ता. १७) श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार होती. तसेच आभार मानणारी सभा देखील क्रांती चौकात होणार होती. मात्र, हे दोन्ही कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चातर्फे कळविण्यात आले आहे.

मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन काढण्यात आले आहे. त्यात म्हटले, की उच्च न्यायालयात बुधवारी (ता. १९) सुनावणी होणार आहे. त्यामुळेच श्रद्धांजली आणि सभा पुढे ढकलण्यात येत आहे. त्यानंतर लवकरच जिल्हाव्यापी बैठक घेऊन सभेची तारीख निश्चित करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे. मात्र, हाती ठोस काहीच न लागता सरकारचे आभार मानले तर आंदोलन भरकटेल, असाही काही समन्वयकांनी माध्यमांकडे भीती व्यक्त केली.
आत्महत्याग्रस्त बांधवांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, कुटुंबातील एकास नोकरी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास निधी उपलब्ध करून देणे, यासह प्रलंबित मागण्याबाबत लढ्याची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे क्रांती मोर्चातर्फे कळविण्यात आले आहे.