रविवारी देखील परभणीत अर्धजलसमाधी, रास्ता रोको 

कैलास चव्हाण
Sunday, 29 July 2018

परभणी जिल्ह्यात अठवडाभरापासून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर हिंसक आंदोलने सुरु आहेत. शनिवारी झालेल्या जाळपोळ आणि दगडफेक आंदोलनामुळे रविवारी देखील सर्वत्र तणावपूर्ण वातावरण आहे.

परभणी - मराठा आरक्षण आंदोलनाची धग रविवारी (ता. 29) देखील परभणी जिल्ह्यात कायम राहिली आहे. इरदळ ता. मानवत येथे दुधना नदीपात्रात अर्ध जलसमाधी आंदोलन तर पिंपळा भत्या ता. पूर्णा येथे रास्ता रोको सुरु झाला आहे.

परभणी जिल्ह्यात अठवडाभरापासून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर हिंसक आंदोलने सुरु आहेत. शनिवारी झालेल्या जाळपोळ आणि दगडफेक आंदोलनामुळे रविवारी देखील सर्वत्र तणावपूर्ण वातावरण आहे. परभणी शहरातील बाजारपेठ भितीदायक वातावरणात सुरु होत आहे. रविवारी पिंपळा भत्या ता. पूर्णा येथे नांदेड ररस्त्यावर रास्ता रोको सुरु झाला आहे. तर इरदळ ता. मानवत येथील दुधना नदीपात्रात सकाळी नऊ वाजता काही आंदोलक उतरले आहेत. पोलिस आणि महसुल प्रशासनाच्या अधिकारी याठिकाणी आंदोलकांची समजुत काढत आहेत. तर बाभळगाव ता. पाथरी येथेही सोनपेठ-परळी रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MarathaKrantiMorcha Rasta Roko Agitation at Parbhani