Martha Kranti Morcha: गळफास घेण्यापासून युवकाला रोखले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 August 2018

औरंगाबाद - रवींद्र साहेबराव जाधव (वय २५, रा. मुंडवाडी, ता. कन्नड) या युवकाने मराठा आरक्षणासाठी गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला; मात्र हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ दोर कापून त्याला रुग्णालयात दाखल केले.

औरंगाबाद - रवींद्र साहेबराव जाधव (वय २५, रा. मुंडवाडी, ता. कन्नड) या युवकाने मराठा आरक्षणासाठी गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला; मात्र हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ दोर कापून त्याला रुग्णालयात दाखल केले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्रचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. खूप प्रयत्न करूनही आरक्षणाअभावी त्याला नोकरी लागत नसल्याने तो तणावात होता. दरम्यान, त्याला गुरुवारच्या मराठा आंदोलनाला जायचे होते; पण घरच्यांनी विरोध केला. त्यातून त्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला; मात्र छताची उंची सात फूट असल्याने त्याचे पाय जमिनीला टेकले. हा प्रकार त्याचा भाऊ राजू जाधव व रामेश्वर घनकर यांच्यासह शेजाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दोर कापत त्याला कन्नड ग्रामीण रुग्णालयात हलवले. तिथे प्रथमोपचार करून त्याला घाटीत हलविण्यात आले.

औरंगाबाद
    औरंगाबादसह जिल्हाभरात आंदोलन, घोषणा
    वाळूज वसाहतीत दोन कंटेनर, एक पोलिस व्हॅन पेटवली, 
    पोलिसांकडून सहा राउंड हवेत गोळीबार, अश्रुधुराचा वापर
    मराठवाड्यात जागोजागी नऊ रेल्वेगाड्या थांबविल्या

हिंगोली
    हिंगोली शहरासह जिल्ह्यात शंभरपेक्षा अधिक ठिकाणी रास्ता रोको
    गाडी अडविल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांचा दुचाकीवरून प्रवास
    सेनगाव येथे एक जीप, मिनी स्कूलबस जाळली
    जवळा पळशी (ता. सेनगाव) रस्त्यावर बैलगाड्यांसह जनावरे उभी केली

बीड
    जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद, व्यापार पेठा, बस, खासगी वाहतूक बंद
    गढी, वडवणीसह जिल्ह्यात दीडशेवर युवकांचे मुंडण
    ठिय्या आंदोलनात बैलगाड्यांसह सहभाग 

उस्मानाबाद
    उस्मानाबादेत आंदोलनस्थळी तीनशे जणांचे रक्तदान
    गिरवली (ता. भूम) येथे आमदार राहुल मोटेंच्या घरासमोर घोषणाबाजी
    कळंब तालुक्‍यात अनेक गावांत रस्त्यावर टायर टाकून वाहने अडविली
    लोहारा येथे मराठा, मुस्लिम, लिंगायत, धनगर समाजाचा ठिय्या

परभणी
    परभणी शहरात तीन ठिकाणी कीर्तन, भजन, पोवाडे गात आंदोलन
    परभणी विभागात एसटीच्या फेऱ्या रद्द, २२ लाखांचा महसूल बुडाला
    पूर्णा ते चुडावादरम्यान, दोन रेल्वेवर दगडफेक, नासधूस, गेटमेनला मारहाण, दुचाकीची तोडफोड
    मानवतजवळील राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका फोडला

जालना
    जालना शहरासह जिल्ह्यात ठीक-ठिकाणी टायर जाळून चक्का जाम
    जालना शहरात येणाऱ्या सर्व चौफुल्यांवर ठिय्या

लातूर
    महापालिकेवर दगडफेक, दोन कारवर दगडफेक, 
    अहमदपूर बस तसेच अग्नाशामक दलाची गाडी फोडली
    निलंग्यात तरुणाचे मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन
    चाकूर येथे महिलेने घेतले विष, रुग्णालयात उपचार सुरू
    रेणापूरला आमदार त्र्यंबक भिसे यांना धक्काबुक्की, त्यांच्या गाडीवर दगडफेक

नांदेड 
    निवघा बाजार ते मानवाडी फाटा येथे झाडे रस्त्यावर टाकून चक्का जाम
    नांदेड - हैदराबाद मार्गावरील मारतळा (ता. लोहा) येथे तंबू टाकून ठिय्या आंदोलन
    नांदेड - हैदराबाद रस्त्यावर शंकरनगर बस स्थानकासमोर बैलगाड्या घेऊन रास्ता रोको


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Martha Kranti Morcha maratha reservation agitation #MaharashtraBandh