Maratha Kranti Morcha: आरक्षणासाठी युवकाने घेतला गळफास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - रवींद्र साहेबराव जाधव (वय 25, रा. मुंडवाडी, ता. कन्नड) या युवकाने मराठा आरक्षणासाठी गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला; मात्र हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ दोर कापून त्याला रुग्णालयात दाखल केले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्रचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. खूप प्रयत्न करूनही आरक्षणाअभावी त्याला नोकरी लागत नसल्याने तो तणावात होता. दरम्यान, त्याला गुरुवारच्या मराठा आंदोलनाला जायचे होते; पण घरच्यांनी विरोध केला. त्यातून त्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला; मात्र छताची उंची सात फूट असल्याने त्याचे पाय जमिनीला टेकले. हा प्रकार त्याचा भाऊ राजू जाधव व रामेश्वर घनकर यांच्यासह शेजाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दोर कापत त्याला कन्नड ग्रामीण रुग्णालयात हलवले. तिथे प्रथमोपचार करून त्याला घाटीत हलविण्यात आले.

आजोबा होते समोर
रवींद्रने ज्या ठिकाणी गळफास घेतला तिथेच त्याच्यासमोर त्याचे शंभर वर्षांचे आजोबा बसलेले होते; पण त्यांना दिसत नसल्याने हा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही.

Web Title: Martha Kranti Morcha maratha reservation agitation #MaharashtraBandh youth suicide