औरंगाबाद जिल्ह्यात आज वाढले 150 रुग्ण, लॉकडाउनबाबत होणार बैठक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

औरंगाबाद शहरातील 101 व ग्रामीण भागातील 49 रुग्णांचा समावेश आहे. 

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ सुरूच असून, आज (ता. 6 जुलै) सकाळच्या सत्रात 150 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यात औरंगाबाद शहरातील 101 व ग्रामीण भागातील 49 रुग्णांचा समावेश आहे. 

आज जिल्हा प्रशासनाची बैठक असून, कोरोनाबाधित वाढत्या रुग्णांची संख्या व उपाय यावर खल होईल. त्यात लॉकडाउन करायचे की नाही, हा निर्णय होणार आहे. 

आज आढळलेल्या बाधितांमध्ये 85 पुरूष आणि 65 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 6 हजार 880 कोरोनाबाधित आढळले असून, त्यापैकी 3 हजार 374 रुग्ण बरे झाले. जिल्ह्यातील एकूण 310 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आता 3 हजार 196 जणांवर उपचार सुरू आहेत. चाचणीसाठी घेण्यात  आलेल्या 934 स्वॅबपैकी आज 150 अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 
 
आज बाधित औरंगाबाद शहरातील 101 रुग्ण 

घाटी परिसर (1), जाधव मंडी (3), अरिष कॉलनी (3), सिडको एन-11 (3), दिल्ली गेट (1), गजानन नगर (4), पुंडलिक नगर (1), छावणी (2), किराणा चावडी (1), एन 11 हडको, (1), आदर्श कॉलनी गारखेडा (1), नाईक नगर (4), उस्मानपुरा (5), उल्कानगरी (2),शिवशंकर कॉलनी (8), एमआयडीसी, चिखलठाणा (1), मातोश्री नगर (2), नवजीवन कॉलनी (1), श्रध्दा कॉलनी (1),  एन-6 (1), एन-2 सिडको, ठाकरे नगर (1), जटवाडा रोड (1), पोलिस कॉलनी (2), दशमेश नगर (7), वेदांत नगर (1), टिळक नगर (1), एन-9 सिडको (1), प्रगती कॉलनी (1), देवळाई, सातारा परिसर (2),जयभवानी नगर (3), अंबिका नगर (1), गजानन कॉलनी (3), पद्मपुरा (15), सिंधी कॉलनी (1),पडेगाव (2), सिल्क मिल कॉलनी (4), रेल्वे स्टेशन परिसर (4), टिव्ही सेंटर (4), अन्य (1)

कोरोना काळामध्ये सर्वच देशांनी आता शस्त्रसंधीचे पालन करावे
  
आज बाधित ग्रामीण भागातील 49 रुग्ण 
 
विहामांडवा (1), सिध्देश्वर नगर, सुरेवाडी (1), कारंजा (1), वाळूज (1), हिरापुर सुंदरवाडी (3), स्वस्तिक सिटी, साजापुर, बजाजनगर (2), सावरकर कॉलनी, बजाज नगर (2),  वडगांव बजाज नगर (2), निलकमल सोसायटी, बजाज नगर (4), साईश्रघ्दा पार्क, सिडको बजाजनगर (5), साऊथ सिटी, बजाज नगर (1), दिशा कुंज, वडगांव कोल्हाटी (1), सायली सोसायटी बजाज नगर (3), शिवाजी नगर, वडगाव कोल्हाटी (2),  जिजामाता सोसा.बजाज नगर (3),  पंचगंगा सोसा. बजाजनगर (1), विश्व विजय सो. बजाजनगर (2), डेमनी वाहेगांव (3), पैठण (3), इंदिरा नगर, वैजापुर (5), अजिंठा (2), शिवणा (1), याभागातील कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

कोरोना विषाणूच्या साथीबाबत सर्वप्रथम सावधानतेचा इशारा चीनने नव्हे तर...
 
कोरोना मीटर 

  • सुटी झालेले रुग्ण    - 3374 
  • उपचार घेणारे रुग्ण - 3196 
  • एकूण मृत्यू             - 310 
  • आतापर्यंतचे बाधित - 6880

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 150 new case of COVID-19 in Aurangabad District