सहा महिन्याचं बाळ आईच्या कुशीत होतं.....पण काळही आला अन् वेळही आली...

संतोष शेळके
बुधवार, 25 डिसेंबर 2019

औरंगाबादहून जालन्याच्या दिशेने भरधाव वेगात आलेली चारचाकी गाडी दुभाजकावरुन विरुद्ध दिशेला येऊन ऍपेरिक्षा वर जोरात आदळली.  शेकटा शिवारातील अमृतसर पेट्रोलपंपासमोर ही घटना घडली.  हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात ऍपेरिक्षातील सर्वच प्रवाशी चिरडले गेले.

औरंगाबाद: औरंगाबाद ते जालना रस्त्यावरील शेकटा फाट्याजवळ रिक्षा व चारचाकी गाडीचा बुधवारी (ता.25) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा- बापरे! ट्रॅव्हल्सचा अपघात एवढा भयानक? (वाचा कुठे घडलाय)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऍपेरिक्षा जालनाकडून औरंगाबादच्या दिशेने येत होता. दरम्यान औरंगाबादहून जालन्याच्या दिशेने भरधाव वेगात आलेली चारचाकी गाडी दुभाजकावरुन विरुद्ध दिशेला येऊन ऍपेरिक्षा वर जोरात आदळली.  शेकटा शिवारातील अमृतसर पेट्रोलपंपासमोर ही घटना घडली.  हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात ऍपेरिक्षातील सर्वच प्रवाशी चिरडले गेले.  यात चार जणांचा जागीच प्राण गेला आणि एक जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शी, मदतीला धावलेल्यांनी सांगितले. अपघातामध्ये चार जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून इतर जण किरकोळ जखमी आहेत. सदर घटनेतील जखमींना औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे वाचलंत का- (व्हिडिओ, फोटोज पहा) काळ्या आईची पुजा करुन तिच्यासोबत अमावस्येला जेवला बळीराजा...

अपघातातील मृत
दिनेश जाधव,  रेणुका दिनेश जाधव, सोहम गणेश जाधव, वंदना गणेश जाधव हे ठार झाले आहेत.  तर अतूल दिनेश जाधव हा जखमी झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 killed in Accident in Aurangabad District