esakal | धक्कादायक! ५०० पटींनी वाढले आंबटशौकीन, महाराष्ट्र मात्र सभ्य
sakal

बोलून बातमी शोधा

Adult Video Seeing Raised In Lockdown Period Aurangabad News

लॉकडाउनमुळे बहुतांश नागरिक घरात आहेत. अशातच जगातच नव्हे, तर भारतातही पोर्न सर्चिंगचे प्रमाण वाढल्याचे गुगल ट्रेंडच्या आकडेवारीतून समोर आले. असे असताना महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण कमी आहे. 

धक्कादायक! ५०० पटींनी वाढले आंबटशौकीन, महाराष्ट्र मात्र सभ्य

sakal_logo
By
विकास देशमुख

औरंगाबाद : जगातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन आहे. महिनाभरापासून लोक घरात अडकून आहेत. अशा परिस्थितीत इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्याही कमालीची वाढली आहे. विशेष म्हणजे मागील महिनाभरात इंटरनेटवर पोर्न साईट्सचे सर्वाधिक सर्चिंग झाले असून, पोर्न हब या अश्‍लील संकेतस्थळाच्या प्रेक्षकांमध्ये तब्बल ५०० पटींनी वाढ झाली.

यात भारतीयांचीही संख्याही मोठी आहे; पण इतर राज्यांचा विचार केला तर महाराष्ट्रातून खूप कमी प्रमाणात पोर्नचे सर्चिंग झाल्याचे गुगल ट्रेंडच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. त्यामुळे इतरत्र ठिकाणी जरी आंबटशौकीन वाढले असले, तरी महाराष्ट्रात त्यांची संख्या कमी आहे. 
 
भारत कुठे? 

आतापर्यंतचा विचार केला मागील ३० दिवसांत गुगलवर ‘पोर्न’ हा शब्द शोधला गेला. ‘पोर्न’ या शब्दाचे सर्वाधिक सर्चिंग जाम्बिया या देशात, तर दुसऱ्या क्रमांकावर नेपाळमध्ये झाले. भारताचे स्थान ५५ वे आहे. ‘सेक्स व्हिडिओ’ या शब्दाचे सर्वाधिक सर्चिंग बांगला देशातून, तर दुसऱ्या क्रमांकावर भारतातून झाले. ‘पोर्न व्हिडिओ’ या शब्दाचे सर्वाधिक सर्चिंग बांगला देशातून झाले असून, भारत दुसऱ्या, तर नेपाळ तिसऱ्या स्थानी आहे. 

काय सांगता : भयंकर! कुत्रा, मांजर, चिमणीलाही कोरोना, आता मनुष्याचे काय? 

 
महाराष्ट्र कुठे? 

भारतात ‘सेक्स व्हिडिओ’ या शब्दाने सर्च करणाऱ्यांमध्ये पहिला क्रमांक ओडिसा, दुसरा मणिपूर, तिसरा आसाम, चौथा मिझोरम, तर पाचवा क्रमांक त्रिपुराचा आहे. महाराष्ट्राचे स्थान २२ वे आहे. केवळ ‘पोर्न’ या शब्दाने शोध घेणाऱ्यांमध्ये अनुक्रमे मिझोरम, मणिपूर, नागालॅंड, अरुणाचल प्रदेश आणि आसाम यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचा क्रमांक ३४ वा आहे. ‘पोर्न व्हिडिओ’ या शब्दाने सर्च करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र २८ व्या स्थानी आहे. 

पोर्न साईट्सवरही कोरोनाचे सर्चिंग 

गंमत म्हणजे पोर्न साईट्सवर जाणाऱ्या युजरपैकी अनेकजण साईट्सवर आल्यानंतर ‘कोरोना’ हा शब्द टाकून सर्च करीत आहेत, अशी माहिती पोर्न हबने मागच्या आठवड्यात माध्यमांना दिली होती. अश्‍लील संकेतस्थळांपैकी पोर्न हब हे सर्वाधिक लोकप्रिय आहे. 

 हेही वाचा - कोरोना बरा होतो; मग एड्सपेक्षा धोकादायक का?


अचानक का वाढली संख्या? 

लॉकडाउनमुळे नागरिक घरात आहेत. इंटरनेट हे त्यांच्याकडे मनोरंजनाचे प्रमुख साधन आहे. त्यातल्या त्यात पोर्न हब या वेबसाइटने महिनाभरासाठी जगातील सर्वच युजरसाठी आपली वेबसाइट मोफत केली आहे. त्यासाठी लॉग-इन करण्याचीही गरज आहे. त्यामुळे अनेकजण या वेबसाइटवर वेळ घालवीत आहेत. 
  

राज्यातील कोणते शहर कुठे? (आकडेवारी ३० दिवसांची : स्रोत- गुगल ट्रेंड) 

  • ‘पोर्न व्हिडिओ’ या शब्दाचे राज्यातून अनुक्रमे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई आणि ठाणे येथून सर्चिंग झाले. 
  • ‘पोर्न’ या शब्दाचे अनुक्रमे पिंपरी-चिंचवड, पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद या शहरांतून सर्चिंग झाले. 
  • ‘सेक्स व्हिडिओ’ या शब्दाचे सर्वाधिक सर्चिंग पुणे येथून झाले. नंतर नागपूर, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड आणि औरंगाबादचा क्रमांक आहे. 

  हेही वाचा - स्वतः कोरोनाग्रस्त, तरीही जपला डॉक्टरी धर्म


 

go to top