esakal | जेव्हा वकीलच होतो आरोपी....अन् न्यायाधीशांसमोर...
sakal

बोलून बातमी शोधा

Court

बनावट सोने गहान ठेऊन व्हॅल्यूअरच्या मदतीने टाउन सेंटर येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या शाखेला ४२ लाख ६३ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली. वकील गंगाधर नाथराव मुंढे (४०, ज्योति नगर) असे त्या संशयिताचे नाव आहे.  त्याला गुरुवारपर्यंत (ता. ९) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमणे यांनी दिले.

जेव्हा वकीलच होतो आरोपी....अन् न्यायाधीशांसमोर...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: बनावट सोने गहान ठेऊन व्हॅल्यूअरच्या मदतीने टाउन सेंटर येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या शाखेला ४२ लाख ६३ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली. वकील गंगाधर नाथराव मुंढे (४०, ज्योति नगर) असे त्या संशयिताचे नाव आहे.  त्याला गुरुवारपर्यंत (ता. ९) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमणे यांनी दिले.

हेही वाचा- कोरोनाचे सर्वच रेकॉर्ड जपून ठेवा, खंडपीठ करणार पाहणी

प्रकरणात महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या टाउन सेंटर सिडको येथील शाखेचे अधिकारी अच्यूत दत्तराव दुधाटे यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, वकील गंगाधर मुंढे व मंगेश नाथराव मुंढे या दोघांनी गोल्ड व्हॅल्यूअर रमेश उदावंत याच्या सहाय्याने बनावट सोने बॅंकेत ठेवुन ४२ लाख ६३ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. ठेवलेले सोने बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर गंगाधर, मंगेश मुंढे व गोल्ड व्हॅल्यूअर रमेश उदावंत यांच्या विरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

क्लिक करा- ...अन्यथा विभागीय कृषी सहसंचालकांना अटक करुन उच्च न्यायालय खंडपीठात हजर करा

दरम्यान आरोपी वकील गंगाधर मुंढे याला न्यायालयात हजर करण्यात आले असता आरापेी गंगाधर मुंढे हा गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार असुन त्याने त्याच्या हस्तक्षराचा तपास करणे आहे. त्याने कर्ज घेतलेल्या पैशांचे काय केले याचा तपास करणे आहे. आरोपीच्या साथीदारांना अटक करणे आहे.

आरोपीचा भाउ मंगेश मुंढे हा पसार असुन त्याला देखील अटक करणे आहे. आरोपी गंगाधर विरोधात क्रांतीचौक, हर्सुल, वेदांतनगर, जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी  असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एन.ए. ताडेवार यांनी न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले.

हेही वाचा: व्याज कापल्याशिवाय बॅंका देईनात पीककर्ज, खरीपात कशी करु पेरणी म्हणत शेतकरी थेट खंडपीठात