
फुलंब्रीतील पाल येथील स्टेडियमच्या उद्घाटनाला सोमवारी (ता.15) अजित पवार आले असता त्यांनी भावशी सुषमा यांची भेट घेतली होती.
फुलंब्री (जि.औरंगाबाद) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फुलंब्री येथील मावशी सुषमा शंकरराव देशमुख (वय 78) यांचे मंगळवारी (ता.16) मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास तीव्र ह्रदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार आज बुधवारी (ता.17) दुपारी एक वाजता होणार आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या त्या मावशी होत्या. सुषमा देशमुख यांच्या अंत्यविधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य येणार असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. हेलिकॉप्टरने अजित पवार येणार असल्याची माहिती त्यांचे मावस भाऊ नितीन देशमुख यांनी सकाळला दिली.
मावशींबरोबर वीस मिनिटे मारल्या गप्पा
फुलंब्रीतील पाल येथील स्टेडियमच्या उद्घाटनाला सोमवारी (ता.15) अजित पवार आले असता त्यांनी भावशी सुषमा यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मावशी, काका व मावस भावाशी वीस मिनिटे गप्पा मारल्या. ही भेट शेवटची ठरली आहे.
संपादन: गणेश पिटेकर