औरंगाबादेत बॅंकांच्या संपामुळे कोट्यावधींचे व्यवहार ठप्प; ही बॅंक मात्र आहे सुरु

प्रकाश बनकर
बुधवार, 8 जानेवारी 2020

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधामुळे पुकारण्यात आलेल्या संपात एसबीआय बॅंक वगळता सर्व बँकांनी सहभाग नोंदवला आहे.

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधामुळे पुकारण्यात आलेल्या संपात एसबीआय बॅंक वगळता सर्व बँकांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे शहरातील सर्व बँक व्यवहार बंद होते. सर्व बँकांतर्फे सकाळी साडेदहा वाजता क्रांती चौकातील बँक ऑफ महाराष्ट्र समोर निदर्शने करण्यात आली.

हेही वाचा- दुचाकीला कट मारल्यावरुन इतक्‍या टोकाला कोणी जातं का? (वाचा नेमंक काय प्रकरण)

त्यानंतर अकरा वाजता देशव्यापी संपातील मोर्चात सहभाग नोंदवला हा मोर्चा क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयावर धडकला. संपात सहभागी बँकांनी ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून बँकांत समोर आज आज संप आहे असे लिहिलेले बोर्ड बँकांसमोर लावण्यात आलेले आहेत. संपाची पूर्वसुचना देण्यात आली असली तरी सरकारी कार्यालये सुरु राहणार असल्याने किमान बॅंकाही सुरु राहतील अशी ग्राहकांची अपेक्षा होती, त्या आशेने ग्राहकांनी थोडे उशिरा बॅंका गाठल्या, मात्र ग्राहकांची निराशा झाल्याचे चित्र औरंगाबादेत पहावयास मिळाले.

हे वाचलंत का?- हिरव्या-भगव्यावरून चंद्रकांत खैरे टार्गेट

कोट्यावधीची व्यवहार ठप्प

एसबीआय बॅंक वगळता सर्व बँकांनी संपात सहभाग नोंदवला यामुळे बहुतांशी बँकांमध्ये कर्मचारीच नव्हते त्यामुळे बँकांनीही ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून आज संप असल्याचा बोर्ड लावला दरम्यान नियमित प्रमाणे होणारे व्यवहार आज ठप्प होते. ब्लॅक चेक क्लिअरन्स या सर्व बंद होते, तरऑनलाईन व्यवहार सुरू होते. त्यामुळे बँकांच्या माध्यमातून दिवसभरातून होणारी कोट्यावधी रुपयांचा व्यवहार आज ठप्प होता.

क्लिक करा- (व्हिडीओ पहा) औरंगाबादेत शासकीय रुग्णालयांचा साडेबाराशे स्टाफ संपावर :...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All Bank employee on strike in Aurangabad without SBI bank