भाजपकडून धर्माधर्मावरुन भेदाचे राजकारण- आनंदराज आंबेडकर 

शेखलाल शेख
मंगळवार, 14 जानेवारी 2020

रामजन्मभूमीचा मुद्दा संपल्याने भाजपकडून सीएए, एनआरसी पुढे केली जात आहे. मात्र आम्ही अन्न, वस्त्र, निवारा याकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत. यांना कोणते रजिस्टर आणायचे असेल तर त्यांनी बेरोजगारांचे रजिस्टर आणावे.

औरंगाबाद : आमचा सीएए, एनआरसीला कडाडून विरोध आहे. रामजन्मभूमीचा मुद्दा संपल्याने भाजकडून सीएए , एनआरसीचा मुद्दा आणला जात आहे. भाजपकडून सध्या धर्मा-धर्मावरुन भेदाचे राजकारण केले जात असल्याची टिका रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केली. मंगळवार (ता.14) पक्षाची नवीन राज्यकार्यकारणी गठीत करण्यात आली त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांचा तो आदेश धुडकावला : सत्ताबदलानंतर महापालिकेत शिवसेना-भाजपात...

रामजन्मभूमीचा मुद्दा संपल्याने भाजपकडून सीएए, एनआरसी पुढे केली जात आहे. मात्र आम्ही अन्न, वस्त्र, निवारा याकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत. यांना कोणते रजिस्टर आणायचे असेल तर त्यांनी बेरोजगारांचे रजिस्टर आणावे. यातून किती बेरोजगार आहे, त्यांची वेगळी माहिती मिळेल. मात्र हे सर्व सोडून केंद्राकडून भेदाभेदाचे राजकारण सुरु आहे.

हेही वाचा : नामविस्तारानंतरचे विद्यापीठ आम्हाला हवेय असे...!

सीएए आणण्याची काय गरज होती ? पाकीस्तान, बांग्लादेशातून आलेल्या 34 हजार लोकांना अगोदरच नागरीकत्व देण्यात आले आहे. मात्र एका धर्माला वगळून त्यांना इतरांना मॅसेज पाठवायचा आहे. यातून राजकीय उद्देश साध्य करणे अतिशय दुर्देवी आहे. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन समता, बंधुत्व, संविधानावर चालले पाहिजे. 

रिपब्लिकन सेनेची वंचितपासून फारकत 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला अपयश आल्यानंतर रिपब्लिकन सेनेने आता आपली वेगळी वाट निवडली आहे. वंचितला अपयश आल्याने आंबेडकरी चळवळीत निराशा आहे.

हेही वाचा : फेक ई-मेलद्वारे बसू शकतो आर्थिक फटका!

त्यामुळे आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्यासाठी रिपब्लिन सेनेची नवीन राज्यकार्यकारणी जाहिर केली. आम्ही स्वतंत्रपणे आमच्या पायावर उभे राहत आहोत. कुणासोबत जायचे का याचा त्यावेळची परिस्थिती बघुन विचार केला जाईल असे आनंदराज आंबेडकर म्हणाले. 

नामविस्ताराची लढाई त्यागावर उभी राहिली 

नामविस्तार दिनाला 25 वर्ष होत आहे. ज्यांना यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. सर्व त्यागून लढ्यात आयुष्याची राख-रांगोळी केली. ज्यांनी आंबेडकरी चळवळीसाठी त्याग केला त्यांचे मनावर पासून धन्यवाद.

ही लढाई त्यागावर उभी राहिली. जेथे अन्याय होतो तेथे लोकांच्या हातात आंबेडकरांचे आणि संविधानाच्या प्रतीचे छायाचित्र असते. जेएनयु, जामिया मध्ये आपण हे बघितले. इतकेच नव्हे तर विरोधकांच्या हातात सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anandraj Ambedkar oppose Caa Nrc Aurangabad News