म्हणून तिने केले केशदान 

अनिल जमधडे
Wednesday, 5 February 2020

अकरा वर्षीय शाळकरी मुलीचा कौतुकास्पद निर्णय 

औरंगाबाद : समाजाच्या कामी आले पाहिजे ही कुटूंबाची शिकवण, सैन्यदलातील वडीलांचे मार्गदर्शन, त्यातच दुर्धर आजाराने आजीचे झालेले निधन या बाबी मनात घर करुन असल्याने गायत्रीने कर्करोग दिनाचे औचित्य साधत स्वत:चे केशदान केले. समाजहिताचा निर्णय अवघ्या अकराव्या वर्षी घेणाऱ्या गायत्रीचे समाजातुनही कौतुक होत आहे. 

क्लिक करा : विद्यार्थिनीला दाखविला सेक्‍स व्हिडीओ आता तो शिक्षक पसार 

पडेगाव भागात राहणारी गायत्री गजानन काळे ही अकरा वर्षाची मुलगी आहे. 2 फेब्रुवारीरोजी तिने केशदान केले. आजीचे 2013 मध्ये कर्करोगाने निधन झाले. त्यमुाळेच गायत्रीचे वडील गजानन काळे यांनी कलाबाई काळे कॅन्सर जनजागृती फाऊंडेशन स्थापून जनजागृतीचे काम सुरु केलेले आहे.

हेही वाचा : बेचाळीस वर्षाचा तो अन सोळा वर्षाची ती, काय झालं वाचा...

गजानन काळे हे सैन्यदलात रडार ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. ते 2 डिसेंबर 2018 रोजी भुवनेश्‍वर असतानाच निवृत्त झाले. सेवानिवृत्तीच्या दिवशी ते सायकलने भुवनेश्‍वर ते पुणेदरम्यान सायकलने कॅन्सरबाबत जनजागृती करत निघाले. रस्त्यात विविध शाळेत त्यांनी कॅन्सरवरील जनजागृतीचे काम केले. ते 25 डिसेंबररोजी पुणे येथे पोहचले, त्या ठिकाणी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. निवृत्तीनंतर त्यांनी कॅन्सर जनजागृतीचे काम अधिक जोमाने सुरु केले हीच प्रेरणा त्यांची अकरा वर्षाची मुलगी गायत्री हिने घेतली. 

जपले सामाजिक भान 

क्लिक करा : कंदिलाने काळवंडलेल्या घरात प्रकाश 

गायत्री केंद्रीय विद्यालयात सातवीत शिकते. परिसरात राहणाऱ्या एका काकुचे कॅन्सरने केस गेले त्यामुळे त्या घराच्या बाहेर निघत नव्हत्या. हे शल्य गायत्रीच्या मनात घर करुन होते. त्यातच काही दिवसपुर्वी किरण गीते या मुलीने केलेल्या केशदानाची बातमी तिने वाचली, तेव्हापासून गायत्रीनेही घरात आग्रह धरला होता. कॅन्सरने केस गेलेल्या रुग्णाला डॉक्‍टरांच्या तपासणीनंतरच नैसर्गिक केसांचा तयार विग वापरावा लागतो.

मुलीची केशदानाची इच्छा असल्याने वडील गजानन काळे यांनी तातडीने संमती दिली. त्यानुसार जागतिक कॅन्सर दिनाचे औचित्य साधून तिने केशदान केले. फाऊंडेशन मुंबई आणि ऍप्रोच हेल्पींग हॅण्ड फाऊंडेशन पुणे यांच्या मार्फत टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे तिचे हे केशदान करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appreciative decision of a schoolgirl