जिल्हा बँक निवडणूक: सिल्लोड, फुलंब्रीतील मतदार सहलीवर; प्रचारातली रंगत वाढली 

Aurangabad district bank
Aurangabad district bank

औरंगाबाद: जिल्हा बँकेच्या संचालक मंडळांची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी प्रचारातही रंगत येत आहे. मतदार फुटू नये, यासाठी फुलंब्री आणि सिल्लोड येथील मतदारांना गोवासह इतर ठिकाणच्या सहलीवर पाठविण्यात आले आहे. हे मतदार आता थेट मतदानाच्या दिवशी शहरात दाखल होणार आहेत. यासाठी विशेष लोकांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत. 

फुलंब्री तालुक्यात ६१ मतदार आहेत. यातील एका मोठ्या गटाच्या काही मतदारांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. अशाच पध्दतीने सिल्लोड येथूनही शिवसेना, भाजपसह राष्ट्रवादीच्या मतदारांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून हे मतदार बाहेर राज्यात सहलीवर आहेत.

यातील सिल्लोडच्या काही महिला मतदार माघारी परतल्याची माहिती सूत्रांनी दिली. २१ मार्चपर्यंत हे मतदार तिकडेच राहणार असून तो पर्यंत त्यांची बडदास्त ठेवण्यात येत आहे. तिथेही काही दगा फटका होऊ नये, यासाठी सातत्याने लोकेशन बदल करण्यात येत आहे. दुसरीकडे मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटीगाठी घेण्यात येत आहेत.

माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या सहकारी शेतकरी विकास पॅनलतर्फे वैजापुरात सभा घेण्यात आली. तर आमदार हरिभाऊ बागडे, नितीन पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनलने फुलंब्री, सिल्लोड येथे सभा घेतल्या. बुधवारी गंगापूर, खुलताबाद, कन्नड आणि वैजापूर येथे सभा घेण्यात आल्या.डॉ.काळे गटातर्फे वैजापूरात सभा,मतदारांच्या गाठीभेटी भर देत प्रत्येक मतदाराला आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 

Hatnur Toll Plaza: हतनूर टोल अखेर सुरू, स्थानिकांना 275 मासिक टोल
 
प्रत्येक मतदारावर हजारो रुपयांचा खर्च- 
गोव्यासह इतर ठिकाणी सहलीसाठी गेलेल्या प्रत्येक मतदाराचा दर दिवशी हजारो रुपयांचा खर्च येत आहे. हा खर्च भागविण्याचे काम या उमेदवारांतर्फे केले जात आहे. मतदारांचा २१ मार्चपर्यंत हा खर्च करावा लागणार आहे. 

मतदारांवर एक नजर -
औरंगाबाद तालुका - ७३ 
सोयगाव - ३६ 
सिल्लोड - ८४ 
खुलताबाद -२७ 
पैठण - ८६ 
कन्नड -१०० 
गंगापूर -९९ 
वैजापूर -११५ 
फुलंब्री - ६१ 
बिगरशेती मतदारसंघ - ३३५ 
कृषी पणन व शेतमाल प्रक्रिया - ४० 
---------- 
एकूण- १०५६ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com