भीषण अपघात! साताजन्माची शपथ राहिली अधुरी; पतीने सोडली मधेच साथ

एकनाथ हिवाळे
Monday, 1 March 2021

हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला आणि ती जागीच जळून खाक झाली होती

बिडकीन (औरंगाबाद): बिडकीन - निलजगाव रोडवर चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात होऊन एक जण ठार तर 1 एक जण गंभीर झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी  बाराच्या सुमारास घडली.

बिडकीन पोलिस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी वरून हरीशचंद्र उत्तमराव गोर्डे वय (50) आणि त्यांची पत्नी गीताबाई हरिश्चंद्र गोर्डे (वय- 45) बिडकीनकडे काही कामानिमित्त येत होते. तर चारचाकी (टी. एन 78 X 8525) ही निलजगावकडे जात होती. त्यात दोन्ही गाड्यांचा अपघात होऊन दुचाकी चालक हरिश्चंद्र गोर्डेंचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी गीताबाई गोर्डे या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना खासगी गाडीने औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे.

पंकजा म्हणतात, 'संजय राठोडनंतर आता धनंजय मुंडेंनीही राजीनामा दिला पाहिजे...

घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज उदावंत, पोलिस उपनिरीक्षक श्री मोरे, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत मुंढे, सतीश बोडले, अर्जुन जोडले यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला आणि ती जागीच जळून खाक झाली होती. या बाबतचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री मोरे हे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad accident news bidkin accident in car and two wheeler man died