esakal | मित्राच्या लग्नाची चालली होती वरात, गाणं होतं झिंगाट; पण कठड्याने केला घात
sakal

बोलून बातमी शोधा

marriage accident

पोलिसांनी त्यांना घटनास्थळ दाखविले. त्यानंतर या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

मित्राच्या लग्नाची चालली होती वरात, गाणं होतं झिंगाट; पण कठड्याने केला घात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: मित्राच्या लग्नाला जाणे पंचवीस वर्षीय तरूणाच्या जीवावर बेतले. मिरवणुकीत नाचताना अंदाज न आल्याने कठडा नसलेल्या विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. कच्चीघाटी (ता. औरंगाबाद) येथे रविवारी (ता.२१)रात्री ८ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहेत.

सचिन गोरखनाथ आरणे (२५, रा. कोपरगाव, जि.नगर, ह.मु. चिकलठाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो चिकलठाणा येथे मेडिकल चालवायचा. त्याची बहीण चिकलठाणा विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) नोकरीला आहे. त्याचा मित्र अर्जून राजपूत याचे रविवारी कच्चीघाटी येथे लग्न होते.

Crime News: बेकरीत काम करणाऱ्या मजुराचा खून; परिसरात खळबळ

रात्रीचे लग्न असल्याने अन्य मित्रांसोबत सचिन तेथे गेला होता. मंदिराजवळच विहीर आहे. या विहिरीला कठडे नसल्याने आणि अंधार असल्याचा अंदाज आला नाही. इकडे नवरदेवाची सवाद्य मिरवणूक सुरू असतानाच सचिनचा तोल गेला आणि तो विहिरीत पडला. हा प्रकार उपस्थितांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सचिनला वाचविण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु, अचानक विहिरीत पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. तसेच, तो पाण्यात बुडाला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

पहिली ग्रामपंचायत बैठक ठरली शेवटची...! अपघातात ग्रामपंचायत महिला सदस्या जागीच...

विहिरीत पडून सचिनचा मृत्यू झाल्याचा प्रकार नातेवाईकांना समजला तेव्हा त्यांनी आक्षेप घेतला. परंतु, पोलिसांनी त्यांना घटनास्थळ दाखविले. त्यानंतर या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली.