esakal | 'माझ्याशी चॅटींग कर, फोटो पाठवं नाहीतर... '; माथेफिरू रोमियोची धमकी

बोलून बातमी शोधा

sakal 1 crime news.jpg}

फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देवून आरोपी तिच्याशी फोनवर बोलत व चॅटींग करीत होता

'माझ्याशी चॅटींग कर, फोटो पाठवं नाहीतर... '; माथेफिरू रोमियोची धमकी
sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: अल्पवयीन मुलीला फोनवर माझ्याशी बोलली नाही, चॅटींग केली नाही किंवा तुझे फोटो पाठविले नाही तर अ‍ॅसिड फेकून तुझे तोंड जाळीन अशी धमकी देणाऱ्या माथेफिरु रोमियोला मुकुंदवाडी पोलिसांनी रविवारी दि.७ रात्री बेड्या ठोकल्या.

सचिन बाबासाहेब लिपणे (२०, रा. प्रकाशनगर, मुकुंदवाडी) असे माथेफिरु रोमीयोचे नाव असून त्याला मंगळवारपर्यंत दि.९ पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. खडसे यांनी सोमवारी (ता.८) दिले. प्रकरणात १७ वर्षीय पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली.

Corona Updates: औरंगाबादमध्ये मागील 24 तासांत कोरोनाचे जवळपास चारशे नवीन रुग्ण

त्यानुसार, २ मार्च रोजी दुपारी पीडितेने फिर्यादीला सांगितले की, वाढदिवसाच्या दिवशी ओळखीचा मुलगा सचिन लिपाणे याने पीडितेसह तिच्या मैत्रणींना पाणीपुरी खाण्यासाठी घेऊन गेला होता. त्यावेळी त्याने पीडितेसोबत फोटो काढले होते. ते फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देवून आरोपी तिच्याशी फोनवर बोलत व चॅटींग करीत होता.

पीडितेने त्याच्याशी बोलणे बंद केल्यानंतर आरोपीने तिला तु माझ्याशी फोनवर बोलली नाही, चॅटींग केली नाही तर अ‍ॅसिड फेकून तुझे तोंड जाळून टाकीन अशी धमकी दिली. प्रकरणात मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Corona Vaccination: आजपासून चोवीस तास लसीकरण; महापालिकेतर्फे पाच ठिकाणी सुविधा

पोलिसांनी आरोपीला अटक करुन आज न्यायालयात हजर केले असता सहाय्यक लोकाभियोक्‍ता राजू पहाडीया यांनी गुन्हा संवेदनशील असून आरोपीने गुन्ह्यात वापरलेला मोबाइल जप्‍त करणे असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले.