सलून दुकानांत चिकन अन् कापड दुकानांत भाजीपाला!

vegetables market
vegetables market

वाळूज (औरंगाबाद): लॉकडाउनमुळे शासनाने दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले. हे आदेश देताना अत्यावश्यक सेवा पुरविणारी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. याच नियमाचा आधार घेत वाळूज येथील सर्वच व्यापारी आपापल्या दुकानातून अत्यावश्यक सेवा देणार आहेत. त्यामुळे सलूनच्या दुकानात चिकन मिळेल, कापड दुकानात भाजीपाला उपलब्ध होईल अन् हॉटेलमध्ये फळफळावळे खरेदी करता येतील! त्यासाठी दुकानांचे फलकही बदलणार आहेत. 

कोरोनामुळे सर्वत्र आर्थिक घडी विस्कटलेली आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे काही लोक तुपाशी तर काही लोक उपाशी, अशी गत व्यापाऱ्यांची झाली आहे. यावर तोडगा काढत शासन नियम न मोडता आगळीवेगळी युक्ती वाळूज येथील व्यापाऱ्यांनी शोधली आहे.

याबाबत नुकतीच व्यापारी संघटनेची बैठक झाली. या बैठकीत अनेकांनी आपापली मते मांडत होत असलेल्या त्रासाचे गाऱ्हाणे मांडले. तसेच अत्यावश्यक वस्तूंच्या नावाखाली अनेक जण नियम मोडण्याचे प्रकार करीत असल्याचे काहींनी सांगितले. त्यामुळे व्यापारी संघटनेने बैठक घेऊन सुरू असलेल्या आपापल्या पूर्वीच्या दुकानातच अत्यावश्यक सेवेचे साहित्य विक्री करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आता वाळूज येथील सर्वच दुकानांत अत्यावश्यक सेवा मिळणार आहे.
 
बैठकीला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण अग्रवाल, महेश गंगवाल, बाबासाहेब गोरडे, अविनाश गायकवाड, संजय खोचे, पंकज शिगरे, कृष्णा काथार, सोहेल पठाण, संतोष जाधव, सचिन वडगावकर, सोहेल पठाण, बालाजी पाटील, शेख हमीद, रवींद्र आढे, श्याम आढाव, ज्ञानेश्वर घारेगावकर, आकाश गोरे आदींची उपस्थिती होती. 

पैठणमध्ये घरी बोलवून नगरसेविकेच्या भावावर चाकूने खुनी हल्ला, हल्लेखोरांचा शोध...
 
राऊत हेअर सलून अँड चिकन सेंटर! 
व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेताना आगळीवेगळी शक्कल लढविली आहे. त्यासाठी दुकानांवर नवीन फलकही लावले जाणार आहेत. त्यात महावीर मटण अँड क्लॉथ सेंटर, राऊत हेअर सलून ॲंड चिकन सेंटर, रंगून टेलर अँड किराणा स्टोअर्स, असे आगळेवेगळे फलक दुकानांवर लावण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणीही दुकाने बंद करा, असे म्हणणार नाही. शिवाय शासनाच्याही नियमांचे काटेकोरपणे पालन होऊन व्यापाऱ्यांनाही व्यवसाय करता येईल, असा तोडगा काढण्यात आला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com