
फुलंब्रीत सदस्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी सहा ठिकाणी केंद्र उभारले आहेत.
फुलंब्री (औरंगाबाद): फुलंब्री तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारातून सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया आठ फेब्रुवारी रोजी राबविली जाणार आहे. परंतु त्यापूर्वी सर्व सदस्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. फुलंब्रीत सदस्यांची सहा ठिकाणी कोरोना चाचणी होणार आहे.
तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सर्व सदस्यांना आपल्या परिसरात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोरोना विषाणूची आर. टी. पीसीआर चाचणी करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार, आळंद, गणोरी, जातेगाव, बाबरा आणि फुलंब्री ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा औरंगाबाद दौरा आटोपता; जाणून घ्या काय झालं या दौऱ्यात
फुलंब्री तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या आहे. या निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी रोजी घोषित करण्यात आला. त्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण २९ जानेवारी रोजी पार पडले. सरपंच पदाचे आरक्षण घोषित झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना भावी सरपंच यांनी सहलीवर नेले आहे.
मुख्यमंत्री ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी औरंगाबादेत मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी...
आठ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत सदस्यांची कोरोना चाचणी करणे सर्वांना बंधनकारक करण्यात आल्यामुळे सहलीवर घेऊन गेलेल्या उमेदवारांची आता तारांबळ उडाली आहे. त्यांना निवडणुकीच्या अगोदरच कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे.
(edited by- pramod sarawale)