esakal | Coronavirus: औरंगाबादमध्ये चार पोलिस निरीक्षकांना कोरोनाची बाधा
sakal

बोलून बातमी शोधा

police tested covid 19 test positive

पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी सोमवारी (ता.२२) मासिक गुन्हे आढावा बैठक नियोजित केली होती

Coronavirus: औरंगाबादमध्ये चार पोलिस निरीक्षकांना कोरोनाची बाधा

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: शहरासह पोलीस दलातही कोरोना वेगाने पसरत आहे. सोमवारी (ता.२२) शहरातील १७ पोलिस निरीक्षकांची अँटीजन चाचणी करण्यात आली, यातून चार पोलीस निरीक्षक हे बाधित आढळले, त्यामुळे आता शहर पोलिस दलातील बाधित अधिकाऱ्यांची संख्या ३८ झाली असून २९६ कर्मचाऱ्यांनाही बाधा झाली आहे. यापैकी चौघांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी सोमवारी (ता.२२) मासिक गुन्हे आढावा बैठक नियोजित केली होती. या बैठकीत हजर राहणाऱ्या १७ अधिकाऱ्यांना ॲंटीजन चाचणी करण्याचे ओदश देण्यात आले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी चाचणी करून घेतली असता चार वरिष्ठ निरीक्षक हे बाधित आढळल्याने त्यांना तातडीने आरटीपीसीआर स्वॅब देण्यासाठी महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड सेंटरवर पाठविण्यात आले होते.

Coronavirus: बापरे! ५५ प्रवाश्यांपैकी २३ प्रवासी पॉझिटिव्ह; हर्सूल टी पॉइंटवरील...

बैठकच रद्द- 
पोलिस आयुक्तांनी सोमवारी (ता.२२) दुपारी साडेबाराच्या सुमारास नियोजित केलेली गुन्हे आढावा बैठक ही चार अधिकारी बाधित झाल्याने रद्द केली. ही बैठक मंगळवारी (ता.२३) दुपारी होणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे, मात्र बैठकीला येणाऱ्यांमध्ये धास्तीचेही वातावरण आहे. 

गड आला पण सिंह 'मारला' गेला...

मेल्ट्रॉनची भूमिका- 
अ‍ॅटीजनमध्ये बाधित आढळलेल्या पोलीस निरीक्षकांना महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड सेंटर येथे आरटीपीसीआर स्वॅब देण्यासाठी वरिष्ठांनी पाठविले, मात्र मेल्ट्रॉन सेंटरवर गेल्यानंतर सेंटरमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ॲंटीजेनमध्ये बाधित दाखविल्यानंतर स्वॅब घेता येणार नाही, असे सांगत आपण आरटीपीसीआरसाठी स्वॅब घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याचे बाधित अधिकाऱ्याने वरिष्ठांना कळविले होते. 

कर्तव्य बजावताना कळत नकळत आपण बाधितांच्या संपर्कात येत असतो, त्यामुळे कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वतःसह कुटूंबाची काळजी घ्यावी. जनतेनेही प्रशासनाला सहकार्य करावे. 
-डॉ. निखील गुप्ता, पोलीस आयुक्त. 

 

(edited by- pramod sarawale)