esakal | "दिल्ली, नोएडा पाठोपाठ आता औरंगाबाद शहरात चार्जिंग सेंटर' 
sakal

बोलून बातमी शोधा

charging car

प्रदूषण कमी करण्यासाठी शासनस्तरावरून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

"दिल्ली, नोएडा पाठोपाठ आता औरंगाबाद शहरात चार्जिंग सेंटर' 

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : प्रदूषण कमी करण्यासाठी शासनस्तरावरून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सुरवातीला शहरात १० ठिकाणी असे स्टेशन उभारले जाणार असून आहेत.

त्यासाठी टाटा मोटर्स व टाटा पॉवर कंपनीसोबत चर्चा झाल्याचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले. दिल्ली, नोएडा पाठोपाठ ठाणे शहरात अशा प्रकारचे चार्जिंग स्टेशन उभारले जात असून, त्यात आता औरंगाबाद शहराचा समावेश होणार असल्याचे श्री. पांडेय यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरात दहा ठिकणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासंदर्भात टाटा मोटर्स व टाटा पॉवर्स कंपनीसोबत चर्चा झाली आहे. त्यांनी सहमतीही दर्शवली आहे.लवकरच याबद्दल सामंजस्य करार होईल- आस्तिकुमार पांडेय (प्रशासक, महापालिका)

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या वाहनांमुळे प्रदुषण झपाट्याने वाढत आहे. ते कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविणे गरजेचे असल्याने केंद्र शासनाने त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

(edited by- pramod sarawale)