esakal | Ease of Living Index 2020: देशात औरंगाबाद राहणीमान सुलभतेत ३४ तर जीवन गुणवत्तेत १३ व्या स्थानी
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad city easy of living index

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि नगर विकास विभागातर्फे बुधवारी देशातील १११ शहरांची गुणवत्ता जाहीर केली

Ease of Living Index 2020: देशात औरंगाबाद राहणीमान सुलभतेत ३४ तर जीवन गुणवत्तेत १३ व्या स्थानी

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद: नागरिकांना राहण्यासाठी मिळणाऱ्या सुलभतेत ईज ऑफ लिव्हिंग (ईओएल) औरंगाबादने ६३ स्थानांची उडी घेत यंदा ३४ वा क्रमांक मिळविला आहे. त्यासोबतच जीवन गुणवत्तेत देशातून शहराला १३ वे स्थान मिळाले आहे. गुरुवारी (ता. चार) यासंदर्भात केंद्र शासनाने घोषणा केली. मोठ्या शहरांमध्ये बंगळूर तर छोट्या शहरातून सिमला शहर प्रथम क्रमांकावर आहेत.

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि नगर विकास विभागातर्फे बुधवारी देशातील १११ शहरांची गुणवत्ता जाहीर केली. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी, गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा व स्मार्ट सिटी मिशनचे संचालक कुणालकुमार आणि राहुल कपूर यांच्या उपस्थितीत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये ही घोषणा करण्यात आली.

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या बनावट जातप्रमाणपत्राचं 'उमरगा...

यावेळी मिश्रा म्हणाले, स्मार्ट सिटी अभियान केवळ योजना किंवा प्रकल्प नसून, नागरिकांच्या विचारसरणीत व राहणीमानात बदल झाला पाहिजे. त्यानुसार ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ शहरांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्याचे साधन आहे. शहरातील शिक्षण, आरोग्य, निवास आणि निवारा तसेच सुरक्षा आणि आर्थिक विकास व मिळणाऱ्या सुविधांच्या आधारे मूल्यांकन केले जाते. गुरुवारी जाहीर झालेल्या क्रमवारीत औरंगाबादला ‘ईज ऑफ लिव्हिंगम’मध्ये ३४ वा क्रमांक मिळाला आहे. 

नाशिक, जबलपूरला टाकले मागे 
१० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये औरंगाबादने नाशिक, रांची आणि जबलपूरसारख्या शहरांना मागे टाकले आहे. तसेच औरंगाबाद शहरातील जीवन गुणवत्ता चंदीगड, नाशिक, नागपूर, पिंपरी चिंचवड आणि जयपूर सारख्या शहरांपेक्षा चांगली असल्याचे स्पष्ट झाले आहे. औरंगाबादची सिटी स्कोअर ५२.९० आहे. तर सरासरी स्कोअर ५२.३८ एवढा आहे. महापालिका कामगिरी निर्देशांकात औरंगाबाद १० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ४७ व्या क्रमांकावर आहे.

लालूच पडली महागात! लसणाच्या पिकात अफूची लागवड केल्याने शेतकऱ्याला जेलची हवा

ही कामाची पावती 
याविषयी महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले की, औरंगाबाद शहराला मिळालेले रॅंकिंग उत्साहवर्धक आहे. मागील काही वर्षांत महापालिका, स्मार्ट सिटी आणि अन्य संस्थांद्वारेद्वारे चांगले काम झालेले आहे. हाच कामाचा वेग कायम राहिला तर पुढच्या वर्षी यापेक्षा चांगली कामगिरी होईल.